बॉक्स ऑफिसवर पॅडमॅन आणि अय्यारीचा होणार सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:11 IST
पुढच्या वर्षी 2018मध्ये अक्षय कुमारचा पॅडमॅन आणि नीरज पांडेचा अय्यारी दोन बहुप्रीक्षित चित्रपट रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा पॅडमॅन ...
बॉक्स ऑफिसवर पॅडमॅन आणि अय्यारीचा होणार सामना
पुढच्या वर्षी 2018मध्ये अक्षय कुमारचा पॅडमॅन आणि नीरज पांडेचा अय्यारी दोन बहुप्रीक्षित चित्रपट रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा पॅडमॅन आणि अय्यारी चित्रपटाचा ट्रेलर टायगर जिंदा हैसोबत ट्रेलर रिलीज होणार आहे. अय्यारी आणि पॅडमॅन 26 जानेवारी 2018ला एकाच दिवशी रिलीज होणार आहे. नीरज पांडे दिग्दर्शित या अॅक्शनपटात सिद्धार्थ एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात मनोज वाजपेयी हा सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. सिद्धार्थ यात एक आर्मी ऑफिसर साकारणार आहे. अय्यारीत सिद्धार्थ, मनोज बाजपेयी, पूजा चोप्रा, स्कुलप्रीत, अनुपम खेर आणि नसीरुद्धीन शाह यांच्या मुख्य भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी ‘पॅडमॅन’चा ट्रेलर आऊट झाला होता. ‘सुपरहिरो है ये पगला’अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. ‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षय व राधिका आपटे या दोघांशिवाय सोनम कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटासोबत अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतेय. हा चित्रपट ट्विंकलने प्रोड्यूस केलेला आहे. चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे; तर सोनम अक्षयवर प्रेम करत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पॅडमॅन या चित्रपटात अरुणाचल मधील मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष आणि स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या ट्रेलरमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे. पण हा त्याचा प्रयोग त्याच्या पत्नीला म्हणजेच राधिका आपटेला रुचलेला नाहीये. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनम त्याला या त्याच्या प्रयोगात मदत करताना आपल्याला दिसत आहे. ALSO RAED : अक्षय कुमार बनला ‘पॅडमॅन’; पाहा, नवे पोस्टर!अॅक्शन हिरो म्हणून ओळख मिरवणाºया अक्षय कुमारने मागील काही वर्षांपासून सामाजिक विषयाला वाहिलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपटदेखील याच पठडीतला चित्रपट आहे. यापूर्वी अक्षय ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपटही असाच सामाजिक विषयाला वाहिलेला होता.