Join us

बॅडमॅन हीच आहे माझी ओळख : गुलशन ग्रोव्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 14:44 IST

गुलशन ग्रोव्हरची ओळख आज बॅडमॅन म्हणूनच आहे. त्याच्या या बॅडमॅन इमेजवर आधारित बॅडमॅन ही बेवसिरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस ...

गुलशन ग्रोव्हरची ओळख आज बॅडमॅन म्हणूनच आहे. त्याच्या या बॅडमॅन इमेजवर आधारित बॅडमॅन ही बेवसिरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. ही वेबसिरिज सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. ही वेबसिरिज आंतराष्ट्रीय स्तरावरील अनेक फेस्टिव्हलमध्ये दाखवली जात आहे. त्याच्या या वेबसिरिजविषयी आणि त्याच्या बॅडमॅन या इमेजविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...आज बॅडमॅन अशीच तुझी ओळख बनली आहे, तुला बॅडमॅन अशी कोणी हाक मारली तर त्यावर तुझी प्रतिक्रिया काय असते?खरे तर कोणालाही बॅडमॅन अशी हाक मारलेली आवडणार नाही. पण मला स्वतःला कोणी बॅडमॅन असे बोलले तर ते मला खूप आवडते. कारण आज अनेक वर्षं मी खलनायक म्हणून काम करत आहे. माझ्या सगळ्या खलनायकी भूमिकांमुळे मला आज प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे मला कोणी बॅडमॅन म्हटले तर ते माझ्या कामाचे कौतुक करत आहे असे मला वाटते. त्यामुळे मला कोणी बॅडमॅन म्हटले तर मला आनंद होतो.बॅडमॅन ही वेबसिरिज प्रेक्षकांना इतकी आवडेल असे तुला वाटले होते का?खरे सांगू तर मला ज्यावेळी बॅडमॅन या वेबसिरिजविषयी सांगण्यात आले त्यावेळी ही वेबसिरिज कोणी पाहील का असा पहिला प्रश्न मला पडला होता. या वेबसिरिजमध्ये मी कोणतीही व्यक्तिरेखा साकारत नसून गुलशन ग्रोव्हर म्हणूनच प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. केवळ या वेबसिरिजची कथा ही काल्पनिक आहे. यात माझी टरदेखील खेचण्यात आली आहे. त्यामुळे ही वेबसिरिज स्वीकारल्यानंतरदेखील मी या वेबसिरिजचा भाग होऊ नये असे मला अनेकवेळा वाटले होते. पण या वेबसिरिजच्या निर्मात्यांनी माझा हा विचार बदलला. आज या वेबसिरिजला मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत मी खूपच खूश आहे. बॅडमॅन या चित्रपटात खलनायक हाच नायक आहे. तुला स्वतःला वेबसिरिज या माध्यमाविषयी काय वाटते?वेबसिरिज हे एन्टरटेन्मेंटचे पुढचे भविष्य आहे असेच मी म्हणेन. सध्या अनेक वेबसिरिज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण प्रेक्षकांना कोणत्या प्रकारच्या वेबसिरिज आवडतात हे सांगणे आजही खूपच कठीण आहे. कारण आज अनेक वेबसिरिजमध्ये शिव्या देणारी मंडळी दाखवली जातात. तसेच अतिशय अॅडल्ट कंटेट पाहायला मिळतंय. त्यामुळे या वेबसिरिज आपल्या कुटुंबियांसोबत पाहाणे अशक्य आहे. पण त्यातही बॅडमॅनसारख्या अतिशय चांगल्या आणि कुटुंबियांसोबत पाहाता येणाऱ्या वेबसिरिज बनवल्या जात आहेत. लोकांना वेबसिरिजमध्ये काय पाहायला मिळते हे काही काळात आपल्याला नक्की कळेल असे मला वाटते. तू अनेक वर्षं चित्रपटांमध्ये काम केले आहेस, वेबसिरिजमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?मी वेबसिरिजमध्ये काम केले असे मला कधी वाटलेच नाही. कारण एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण कशाप्रकारे केले जाते, त्याचप्रमाणे आम्ही वेबसिरिजचे चित्रीकरण केले होते. पण भविष्यातदेखील मला बेवसिरिजमध्ये काम करायला नक्कीच आवडेल.