Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यमान खुराणा जोरात!! ‘बधाई हो’ने पहिल्या दिवशी रचला विक्रम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 18:27 IST

आयुष्यमानच्या अलीकडे रिलीज झालेल्या ‘अंधाधुन’ या चित्रपटात बॉक्सआॅफिसवर जोरदार कमाई केली. यानंतर कालचं रिलीज झालेल्या आयुष्यमानच्या ‘बधाई हो’ या चित्रपटानेही बॉक्सआॅफिसवर जोरदार सुरूवात केली आहे.

बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणासाठी हे वर्ष चांगलेच भाग्याचे राहिले आहे. आयुष्यमानच्या अलीकडे रिलीज झालेल्या ‘अंधाधुन’ या चित्रपटात बॉक्सआॅफिसवर जोरदार कमाई केली. यानंतर कालचं रिलीज झालेल्या आयुष्यमानच्या ‘बधाई हो’ या चित्रपटानेही बॉक्सआॅफिसवर जोरदार सुरूवात केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी आयुष्यमानने स्वत:च्याच चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला. होय,‘बधाई हो’ आयुष्यमानच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनर फिल्म ठरली.  ‘बधाई हो’ने पहिल्याच दिवशी ७.२९ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. यापूर्वी आयुष्यमानच्या कुठल्याच चित्रपटाने पहिल्या दिवशी इतकी कमाई केलेली नाही. आयुष्यमानच्या पाच सर्वात मोठ्या ओपनर्सची यादी करायची झाल्यास ‘बधाई हो’ सर्वात वर आहे. यापाठोपाठ ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाचा क्रमांक आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २.७१ कोटी रूपये कमावले होते. ‘अंधाधुन’ने पहिल्या दिवशी २.७० कोटी तर ‘बरेली की बर्फी’ने २.४२ कोटींचा बिझनेस केला होता. ‘विक्की डोनर’ने १.८० कोटी कमावले होते.‘बधाई हो’ हो एका वेगळ्या विषयाला वाहिलेला चित्रपट आहे. नातवंडांना खेळवण्याच्या वयात आयुष्यमानची आई प्रेग्नंट राहते आणि ही गोष्ट जगापासून लपवता लपवता आयुष्यमान रडकुंडीला येतो, अशी याची ढोबळ कथा आहे. मजेदार अंदाजातील ही कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाला उत्स्फूर्त दाद दिली आहे.

टॅग्स :बधाई होआयुषमान खुराणा