Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकी कौशल-तृप्ती डिमरीचा 'बॅड न्यूज' हिट की फ्लॉप? पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 09:02 IST

विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या बॅड न्यूज सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय (bad newz)

विकी कौशल-तृप्ती डिमरीचा 'बॅड न्यूज' सिनेमा काल १९ जुलैला भारतभरात रिलीज झाला. 'बॅड न्यूज' सिनेमा यावर्षातला बहुचर्चित सिनेमा होता. इतकंच नव्हे तर 'ॲनिमल' सारखा सिनेमा गाजवल्यानंतर तृप्तीच्या 'बॅड न्यूज' या आगामी  बॉलिवूड सिनेमाची उत्सुकता शिगेला होती. विकी कौशल - तृप्ती डिमरी या दोघांची केमिस्ट्री टीझर, ट्रेलर, गाण्यांमधून लोकांना आवडली. याच 'बॅड न्यूज' सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, जाणून घ्या. 

'बॅड न्यूज'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

'बॅड न्यूज' सिनेमाचा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. याकडे नजर गेल्यास 'बॅड न्यूज'ने पहिल्या दिवशी ८.५० कोटींची कमाई केलीय. ही कमाई ठीकठाकच म्हणता येईल. सतत पडणाऱ्या पावसाचा फटका 'बॅड न्यूज'ला पडलाय. याशिवाय सिनेमा काही जणांना चांगला वाटतोय तर काहींना सिनेमा आवडत नाहीय. आता पुढील काही दिवसात 'बॅड न्यूज' कशी कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

'बॅड न्यूज' कोणत्या ओटीटीवर पाहायला मिळेल?

आनंद तिवारी दिग्दर्शित 'बॅड न्यूज'च्या ओटीटी रिलीजबाबत चर्चा सुरू झाली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे डिजिटल अधिकार प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राइम व्हिडीओला विकले आहेत. ज्यावरून हे स्पष्ट होते की ''बॅड न्यूज'' OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. सुमारे दोन महिन्यांनी 'बॅड न्यूज' सप्टेंबरमध्ये ओटीटीवर धडकू शकतो. मात्र, स्टार कास्ट किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

 

टॅग्स :विकी कौशलतृप्ती डिमरीपैसा