Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिकच्या 'क्रिश ४'ची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी! सिनेमाचं शूटिंग सुरु होण्यापूर्वीच थांबलं; कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:40 IST

भारताचा लाडका सुपरहिरो 'क्रिश ४' पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. 'क्रिश ४' चित्रपटाचं शूटिंग सुरु होण्याआधीच थांबलं आहे. जाणून घ्या सविस्तर

भारताचा लाडका सुपरहिरो 'क्रिश ४' पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. हृतिक रोशनच्या 'क्रिश ४' या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये बजेटवरून मोठी अडचण निर्माण झाली असून, हृतिक रोशन आणि निर्माता आदित्य चोप्रा यांच्यात यावरून एकमत होत नसल्याची बातमी समोर आली आहे. ५०० कोटींच्या अवाढव्य बजेटच्या मागणीमुळे 'क्रिश ४' चित्रपटाचं शूटिंग सुरु होण्याआधीच थांबलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हृतिक रोशन या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.'क्रिश ४'ला जागतिक दर्जाचा सुपरहिरो अनुभव देण्यासाठी हृतिक ५०० कोटी रुपयांच्या बजेटवर ठाम आहे. त्याला चित्रपटातील ॲक्शन आणि व्हीएफएक्स (VFX) अतिशय उच्च दर्जाचे हवे आहेत. मात्र, यशराज फिल्म्सचे (YRF) सर्वेसर्वा आदित्य चोप्रा इतकी मोठी रक्कम गुंतवण्यास तयार नाहीत. आदित्य चोप्रा यांच्या मते, या चित्रपटाचे बजेट ३५० कोटी रुपयांपर्यंत मर्यादित ठेवणे व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.

त्यामुळे हृृतिक आणि आदित्य यांच्यात सध्यातरी बजेटबाबत कोणताही सुवर्णमध्य निघू शकलेला नाही, त्यामुळे सध्या या चित्रपटाचे शूटिंग आणि प्री-प्रोडक्शनचे काम थांबवण्यात आले आहे. हृतिक आता या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर पुन्हा काम करत असून, आदित्य चोप्राने दिलेल्या सुचनांनुसार चित्रपटाचा खर्च कमी करत त्याचा थरार कसा टिकवून ठेवता येईल, याचा प्रयत्न करत आहे. बजेटच्या या वादामुळे २०२६ मध्ये सुरू होणारे शूटिंग आता आणखी लांबणीवर पडलं आहे.

या चित्रपटाबाबत एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याचे म्हटले जात आहे. ती पुन्हा एकदा 'क्रिश ४' चित्रपटात हृतिकसोबत मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, हृतिक रोशन सध्या आपल्या इतर प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत असून, लवकरच तो एका नवीन चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे. हृतिकचा नुकताच प्रदर्शित झालेला 'वॉर २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही, त्यामुळे 'क्रिश ४' हा त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Budget woes halt Hrithik's 'Krrish 4'; Priyanka Chopra comeback?

Web Summary : Hrithik Roshan's 'Krrish 4' faces delays due to budget disagreements with Aditya Chopra. Hrithik wants a grand scale with a ₹500 crore budget, while Chopra prefers ₹350 crore. Script revisions are underway. Priyanka Chopra is rumored to return.
टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूडप्रियंका चोप्राराकेश रोशनआदित्य चोप्रा