Join us

​ मौनी रायच्या चाहत्यांसाठी आहे एक वाईट बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 13:52 IST

अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ नामक चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करण्यास सज्ज असलेली अभिनेत्री मौनी राय हिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ...

अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ नामक चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करण्यास सज्ज असलेली अभिनेत्री मौनी राय हिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, ही बातमी वाचून मौनीच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो.  मौनीने नुकतेच ‘गोल्ड’चे शूटींग संपवले आहे आणि सध्या ती श्रीलंकेत हॉलीडे एन्जॉय करतेय. पण इकडे म्हणाल तर मौनीच्या ब्रेकअपची बातमी चर्चेत आहे.होय, मौनी राय आणि तिचा बॉयफ्रेन्ड मोहित रैना यांच्या ब्रेकअप झाल्याची खबर आहे. ‘देवो का देव महादेव’ या लोकप्रीय मालिकेच्या सेटवर मौनी व मोहित यांचे प्रेम बहरले होते. तेव्हापासून दोघेही सोबत होते. पण अलीकडे या लव्हबर्ड्सचे मार्ग बदलल्याचे ऐकीवात येतेय. अर्थात मौनी किंवा मोहित यापैकी दोघांनीही ही न्यूज कन्फर्म केली नाही. पण सोशल मीडियावर दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्याने या चर्चेला जोर चढला आहे.मौनी व मोहित दोघेही twiiter आणि इन्स्टाग्रामवर चांगलेच अ‍ॅक्टिव्ह आहे. आजपर्यंत दोघेही एकमेकांसोबतचे फन अ‍ॅण्ड लव्ह मोमेंट शेअर सोशल मीडियावर शेअर करायचे. पण आता दोघांनीही एकमेकांना अपफॉलो केले म्हटल्यावर सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. मौनीने तर मोहितसोबतचे अनेक फोटोही आपल्या अकाऊंटवरून डिलिट केले आहेत. आता दोघांमध्ये नेमके काय सुरु आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण दोघांमध्येही काही तरी बिनसलेयं, असा अंदाज मात्र यावरून काढता येऊ शकतो.ALSO READ : मौनी रॉयचे हे हॉट फोटो तुम्ही बघितले का ?यापूर्वीही मोहित व मौनीच्या ब्रेकअपच्या बातम्या चर्चेत होत्या. अर्थात त्यावेळी मोहितने या बातम्यांचा इन्कार केला होता. धीस इज आॅल रबीश, असे तो म्हणाला होता. तिला तिच्या कामावर फोकस करू द्या. ती प्रचंड मेहनत घेतेय. आपल्या कामासाठी रात्रीचा दिवस करतेय. तिच्या यशाचे कौतुक करायचे सोडून काही लोक तिला खाली खेचू पाहत आहेत, असे मोहित म्हणाला होता. मोहित अशाप्रकारे मौनीच्या पाठीशी उभा असेल तर ते चांगलेच आहे. त्यामुळेच  मोहित व मौनीचे नाते तुटू नये, अशी चाहत्यांचीही इच्छा आहे.