मूळ ‘लैला ओ लैला’ गाण्यातील बॅकग्राउंड डान्सर ‘रईस’ व्हर्जनमध्येसुद्धा नाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 14:10 IST
१९८० साली आलेल्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील ‘लैला ओ लैला’ या गाण्यात झीनत अमानच्या मागे नाचाणारा डान्सर बुलबुल ‘रईस’मध्ये वापरण्यात येणाºया नवीन व्हर्जनमध्येसुद्धा नाचलेला आहे.
मूळ ‘लैला ओ लैला’ गाण्यातील बॅकग्राउंड डान्सर ‘रईस’ व्हर्जनमध्येसुद्धा नाचला
काय योगायोग आहे बघा! नशीब कोणाला काय संधी देईल आणि एक अविस्मरणीय आठवण निर्माण करेल याचा काही नेम नाही. शाहरुखच्या ‘रईस’मध्ये ‘लैला ओ लैला’ हे ‘कुर्बानी’ (१९८०) चित्रपटातील गाणे रिमिक्स करून वापरण्यात आले. मूळ गाणे झीनत अमान यांनी अजरामर केल्यावर या नव्या व्हर्जनमध्ये सनी लिओनीची जादू पाहायला मिळतेय.मजेशीर गोष्ट अशी की, ३६ वर्षांपूर्वी ‘लैला ओ लैला’ या गाण्यात बॅकग्राउंड डान्सर म्हणून नाचलेला बुलबुल या नव्या व्हर्जनच्या व्हिडिओमध्येसुद्धा आहे. दोन्ही गाण्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने तो खूप खुश आहे. गाण्याच्या व्हिडिओमध्ये तो कंदील घेऊन शाहरुख-सनीला चिअर अप करताना दिसतो.त्याला ही संधी कशी मिळाली याबाबत तो सांगतो की, ‘माझ्या एका मित्राच्या मुलाने मला या नव्या गाण्याविषयी सांगितले. मी लगेच दुसऱ्या दिवशी स्टुडिओत गेलो आणि कोरिओग्राफर बॉस्को मार्टिसला भेटलो. त्याला सांगितले की, मी ओरिजनल गाण्यात काम केलेले आहे. त्याला विश्वासच बसला नाही. तो म्हणाला की, ‘चाचा, मजाक मत करो.’ मग मी त्याला गाण्यातील माझे फोटो दाखवले आणि तो आवाकच झाला. तेव्हा त्याने माझी निवड केली.’ दोन्ही व्हर्जनपैकी कोणते गाणे आवडते असे विचारल्यावर तो सांगतो की, ‘झीनतजी त्याकाळातील सर्वात मोठ्या स्टार होत्या. तशीच सनीसुद्धा आहे. पण ओरिजिनल गाणे आजही लोकप्रिय आहे. म्हणून मी त्याला झुकते माप देईल. पण नवीन व्हर्जनसुद्धा खूप छान असून जसे त्या गाण्यावर थिएटरमध्ये शिट्या पडायच्या तसाच प्रतिसाद या गाण्याला मिळो अशी माझी इच्छा आहे.’सनीच्या डान्सिंग स्कीलविषयी तो म्हणतो, ‘ती फार चांगली नाचते. खूप मेहनतीसुद्धा आहे. शाहरुख भाई तो बेस्ट डान्सर है ही. या गाण्यात त्यांनी परफॉर्म केले नाही पण त्यांची उपस्थितीच पुरेशी आहे.’ बुलबुलला हीरो व्हायचे होते. ‘चित्रपटांविषयी मला नेहमीच आकर्षण वाटले आहे. दिलीप कुमार माझे आवडते हीरो. मी अभिनेता होऊ नाही शकलो याचं दु:ख किंवा पश्चाताप नाही. शेवटी नशीबावर सर्व काही अवलंबून असते’, असे तो म्हणतो.