Shall we go to the final ? Reckon my mate @SrBachchan can get us a couple of tickets
बच्चन, फ्लिंटॉफ यांच्यात ट्विटरयुद्ध सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 15:36 IST
अमिताभ बच्चन आणि इंग्लंडचा खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफ यांच्यातील ट्विरवरील वाद अजून थांबला नाही. बुधवारी इंग्लंडने न्यूझीलंड संघास हरवून अंतिम ...
बच्चन, फ्लिंटॉफ यांच्यात ट्विटरयुद्ध सुरुच
अमिताभ बच्चन आणि इंग्लंडचा खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफ यांच्यातील ट्विरवरील वाद अजून थांबला नाही. बुधवारी इंग्लंडने न्यूझीलंड संघास हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर अँड्र्यू फ्लिंटॉफने ट्विट करुन ‘आम्हाला अंतिम सामन्याची तिकीटे मिळतील काय?’ असा सवाल अमिताभ बच्चन यांना केला आहे. त्यावर चिडलेल्या विराट कोहलीने ट्विट करुन ‘तिकीट तुमच्या तोंडावर फेकून मारु का पार्सल पाठवू’ असे म्हटले आहे.भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० क्रिकेट सामन्यानंतर अँड्र्यू फ्लिंटॉफने विराट कोहलीला टोला लगावल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी कोण हा रुट, उखडून टाकू असे ट्विट केले होते. त्यावर ‘हे कोण आहेत?’ असे ट्विट फ्लिंटॉफने अमिताभ बच्चन यांच्याबाबत केले होते. रवींद्र जडेजा याने यावर ‘रिश्ते मे तो वो तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहेनशहा’ असे ट्विट करुन सडेतोड उत्तर दिले होते.