Join us

बेबी श्रीदेवीचा व्हिडीओ झाला व्हायरल; एक कोटींपेक्षा अधिक लोकांनी बघितला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 20:49 IST

​यू-ट्यूबवर एका मुलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या चिमुकलीचे नाव ‘बेबी श्रीदेवी’ असे सांगण्यात येत आहे.

यू-ट्यूबवर एका मुलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या चिमुकलीचे नाव ‘बेबी श्रीदेवी’ असे सांगण्यात येत आहे. नोएक्स टीव्ही चॅनेलने मे २०१७ मध्ये हा व्हिडीओ अपलोड केला होता. हा व्हिडीओ आतापर्यंत १.२० कोटींपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. या मुलीची तुलना श्रीदेवी यांच्याशी केली जात आहे. व्हिडीओमध्ये या चिमुकलीच्या चेहºयावरील हावभाव खूपच निरागस असून, ते अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी काहीसे साम्य साधणारे आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या वाºयासारखा व्हायरल होत आहे. बेबी श्रीदेवी या नावाने ही चिमुकली खूपच लोकप्रिय होताना दिसत असून, तिच्या चेहºयावरील निरागस भाव लोकांना आपलेसे करीत आहेत.