Join us

‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनाही कोरोना, कुटुंबीयांनाही झाली लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 13:29 IST

ट्वीट करत दिली माहिती...

ठळक मुद्दे सध्या राजमौली ‘आरआरआर’ या सिनेमावर काम करत आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रकोप कमी होण्याऐवजी वाढताना दिसतोय. सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. बच्चन कुटुंबानंतर आला ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तिंचे अहवालही पॉझिटीव्ह आले आहेत.राजमौली यांनी स्वत: ही माहिती दिली. सोशल मीडियावर त्यांनी सांगितले, ‘मला व माझ्या कुटुंबीयांना काही दिवसांपासून ताप होता. हा ताप हळूहळू कमी झाला. पण आम्ही टेस्ट केल्यात. रिपोर्टमध्ये आमच्यात कोरानाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्हाला होम क्वारंटाइन करण्यात आले. सध्या आमच्यात कुठलीही तीव्र लक्षणे नाहीत. मात्र काळजी आणि सूचनांचे काटेकोर पालन करत आहोत,’ असे त्यांनी सांगितले.

राजमौलींनी आणखी एक ट्वीट करत बरे झाल्यानंतर प्लाज्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

राजमौली हैदराबादेत पत्नी रामा राजमौली आणि मुलगी एसएस मयूखा यांच्यासोबत राहतात. राजमौलींचा मुलगा एस.एस. कार्तिकेय व सून पूजा प्रसाद सध्या त्यांच्यासोबत आहेत वा नाहीत, हे स्पष्ट झालेले नाही.राजमौली यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’ने इतिहास रचला होता. या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम तोडले होते. सध्या ते ‘आरआरआर’ या सिनेमावर काम करत आहेत. या सिनेमात एनटी रामाराव ज्युनिअर, रामचरण, आलिया भट, अजय देवगण, श्रीया सरन मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :एस.एस. राजमौली