Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो.. वडिलांशी खोटे बोलून लास वेगासला गेली होती जान्हवी कपूर, स्वतःच पोलखोल केली सीक्रेट ट्रिपची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 20:05 IST

जान्हवीने इशान खट्टरच्या अपोझिट 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

जाह्नवी कपूर आतापर्यंत फक्त 2 बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसली असेल पण तिच्या अदा आणि सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. श्रीदेवी आणि बोनी कपूरची लाडकी जान्हवी अनेक सिनेमा दिसणार आहे. जरी जान्हवी तिचे वडील बोनी कपूर यांच्या अगदी जवळ असली तरी, नुकत्याच तिने आपल्या वडिलांशी खोटे बोलून ट्रिपला गेली असल्याचा खुलासा केला आहे.

जान्हवी कपूर अलीकडेच करीना कपूरच्या चॅट शोमध्ये आली होती. या चॅट दरम्यान जान्हवी कपूरने सांगितले की, एकदा तिने आपले वडील बोनी कपूर यांच्याशी खोटे बोलली होती. तिने सांगितले की, ती एकदा खोटे बोलून लास वेगासला ट्रिपला गेली होती. जान्हवी म्हणाली, तिने वडिलांना सांगितले की ती एक सिनेमा पाहायला जातेय आणि फ्लाईट पकडून ती लस वेगाला गेली.  तिने लॉस एंजेलिसहून लस वेगासला जाऊन संपूर्ण दिवस तिकडे फिरवून परत लॉस एंजेलिसला परतली. 

वर्क फ्रंटबद्दल बोलताना जान्हवीने इशान खट्टरच्या अपोझिट 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिचा 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' सिनेमा रिलीज झाला होता. आता जान्हवीचा पुढचा चित्रपट राजकुमार रावसोबत 'रुही अफसाना' मध्ये दिसणार आहे. या शिवाय जान्हवी करण जोहरच्या  'दोस्ताना 2' आणि 'तख्त'मध्येही काम करणार आहे. अलीकडेच जान्हवीच्या 'गुड लक जेरी' या दुसर्‍या चित्रपटाचा फर्स्ट लूकही रिलीज झाला आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूर