Join us

​‘दंगल’मध्ये माझ्या भावाचा जन्म दाखविला नाही - बबिता फोगट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 19:40 IST

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची प्रमुख भूमिका असलेला दंगल हा चित्रपट बॉक्स आॅफिसमध्ये विक्रम करीत आहे. दंगल हा चित्रपट ...

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची प्रमुख भूमिका असलेला दंगल हा चित्रपट बॉक्स आॅफिसमध्ये विक्रम करीत आहे. दंगल हा चित्रपट भारतीय कुश्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे. यात आपल्या मुलींना कु श्तीपटू बणविण्यासाठी महावीर सिंग फोगट यांनी केलेला संघर्ष दाखविण्यात आला आहे. मात्र या चित्रपटात महावीर सिंग यांच्या मुलाचा जन्म दाखविण्यात आला नसल्याने आमचा भाऊ दुष्यंत निराश झाला होता असे फोगट सिस्टर्सनी सांगितले. फेसबुक लाईव्ह चाटवर बबीता फोगटसह तिच्या बहिणींनी संवाद साधला. बबिताने फेसबुक लाईव्ह चॅटची सुरुवात करताना आपल्या भावंडाची ओळख करून दिली. बबिता म्हणाली, हा आमचा भाऊ दुष्यंत, दंगल मध्ये याचा जन्म दाखविण्यात आला नाही. यामुळे हा फार निराश झाला होता. चित्रपट संपल्यावर दुष्यंत नाराजगीच्या सुरात म्हणाला कमीत कमी माझा जन्म तर दाखवायचा होता ना. यावर आम्ही त्याची समजूत घातली व ‘दंगल २’ मध्ये तुझा जन्मही दाखविला जाईल व तू मिळविलेली पदके देखील जाईल असे सांगितले. एका प्रश्नाच्या उत्तरात बबिता फोगट म्हणाली, मी जर रेसलर नसते तर आतापर्यंत माझे लग्नही झाले असते व मी हाऊसवाईफ असते, आम्ही कुश्तीपटू असल्याने आमच्या लग्नाला उशीर झाला. फेसबुक चॅटदरम्यान आपल्या बहिणीसोबत पत्ते खेळणारी बबिता म्हणाली, आम्ही वडिलांच्या परवानगीने कुश्तीमध्ये आलो याशिवाय आम्ही दुसरा कोणत्याच खेळात आमचा रस नाही. पत्ते खेळण्यासाठी वडीलही आमच्यासोबत येतात. आमच्या घरी कुश्तीशिवाय कोणताच खेळ खेळला जाईल असे आम्हाला वाटत नाही. फोगट कुंटुंबात जन्म घेणारा प्रत्येक जण कुश्तीच खेळेल असेही बबिता म्हणाली. कुश्तीमध्ये करिअर करणाºया महावीर सिंग यांच्या बबिता, संगीता, रितू, गीता व मुलगा दुष्यंत लाईव्ह चॅटमध्ये सामील झाले होते.आमिर खानच्या दंगल या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होण्याचा मान मिळविला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत देशाअंतर्गत बाजारात ३८५ कोटीहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट ४०० कोटीची कमाई करू शकतो असा अंदाज लावला जात आहे.