Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबा घेताहेत आई-बाळाची काळजी....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 14:34 IST

 शाहीद कपूर आणि मीरा राजपूत कपूर हे दोघे आता त्यांच्या बाळाचे पालक होणार आहेत. त्यामुळे शाहीद पत्नी मीराची खुप ...

 शाहीद कपूर आणि मीरा राजपूत कपूर हे दोघे आता त्यांच्या बाळाचे पालक होणार आहेत. त्यामुळे शाहीद पत्नी मीराची खुप काळजी घेताना दिसत आहे. काल मुंबईतील एका हॉटेलमध्ये ते डिनर करून बाहेर पडतांना त्यांचे काही फोटो काढण्यात आले. यावेळी ज्यापद्धतीने शाहीद त्याची पत्नी मीराला हातात हात धरून बाहेर घेऊन जात होता ते पाहून कोणालाही वाटेल की, ‘शाहीद-मीरा हे ‘मेड फॉर इच अदर’ आहेत. यावेळी ते खुपच क्यूट दिसत होते. लवकरच शाहीद बाबा होणार असल्याने तो बेहद खुश आहे. उडता पंजाब मध्ये तो रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच रंगूनमध्येही तो त्याच्या आगळ्यावेगळया रूपात दिसणार आहे.