साऊथ स्टार सत्यराज संपूर्ण देशात केवळ एका भूमिकेमुळे लोकप्रिय झालेत. ही भूमिका होती, कटप्पाची. होय, एसएस राजमौली यांच्या ‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’ या चित्रपटात सत्यराज यांनी साकारलेली कटप्पाची भूमिका लोकांनी इतकी डोक्यावर घेतली की, सत्यराज यांना कधी नव्हे इतकी लोकप्रियता मिळाली. कटप्पाची भूमिका साकारणा-या याच सत्यराज यांच्यासोबत आता ऐश्वर्या राय बच्चन ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे.
चर्चेनुसार, मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्निनी सेल्वम’मध्ये ऐश्वर्यासोबत तिचे सासरे अमिताभ बच्चन हेही दिसू शकतात.अर्थात अद्याप अमिताभ आपल्या बिझी शेड्यूलमुळे या चित्रपटाला होकार देऊ शकलेले नाहीत.‘पोन्निनी सेल्वम’मध्ये ऐश्वर्याच्या पतीची भूमिका आधी अभिनेते मोहनबाबू साकारणार अशी चर्चा होती. त्यांनी या चित्रपटासाठी होकार दिल्याचेही म्हटले गेले होते. पण आता कदाचित त्यांच्याजागी सत्यराज यांची वर्णी लागली आहे. साहजिकच कटप्पा व ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स कसा रंगतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.२०१८ मध्ये प्रदर्शित ‘फन्ने खां’ हा ऐश्वर्याचा अखेरचा बॉलिवूड सिनेमा होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. त्यापूर्वी ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या दिसली. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. पण याचे श्रेय ऐश्वर्याऐवजी, अनुष्का शर्मा व रणबीर कपूरच्या नावावर चढले. अशात हा चित्रपट ऐश्वर्याच्या करिअरला किती गती देतो, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.