Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बाहुबली' फेम प्रभास लवकरच बांधणार लग्नगाठ?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 11:59 IST

Prabhas: साउथ सिनेइंडस्ट्रीतील सुपरस्टार प्रभास त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येत असतो. सध्या त्याच्या लग्नाची चर्चा होताना दिसत आहे.

साऊथ सिनेइंडस्ट्रीतील सुपरस्टार प्रभास (Prabhas) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येत असतो. या अभिनेत्याचे केवळ दक्षिण भारतातच नाही तर देशभरात चाहते आहेत. प्रभासचे लग्न त्याच्या चाहत्यांमध्ये आणि फॉलोअर्समध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकवेळा अभिनेत्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे आणि आता लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार अभिनेता लग्नासाठी सज्ज झाला आहे. प्रभास लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, बाहुबली फेम स्टार प्रभासचे काका कृष्णम राजू याबाबत लवकरच याची घोषणा करणार आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ चर्चेत आला आहे, ज्यामध्ये प्रभासच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल बोलले जात आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते खूप खूश झाले आहेत आणि आपल्या आवडत्या स्टारच्या लग्नाची वाट पाहत आहेत. जिथे ते म्हणत आहेत की बाहुबली स्टारसाठी आधीच मुलीची निवड केली आहे.

व्हिडिओमध्ये अभिनेत्याचे काका म्हणतात की, वेळ आल्यावर कुटुंबीय प्रभासच्या लग्नाची अधिकृत घोषणा करतील. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे सलमान खानचे लग्न चाहत्यांमध्ये चर्चेत आहे, त्याचप्रमाणे प्रभासचे लग्नही साऊथ सिनेसृष्टीत चर्चेत आहे. ४२ वर्षीय प्रभास अखेर लग्न कधी करणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, प्रभास नुकताच पूजा हेगडेसोबत राधेश्याममध्ये दिसला होता. सध्या तो दिग्दर्शक प्रशांत नीलसोबत त्याच्या आगामी ‘सलार’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. साऊथ सुपरस्टारचा हा चित्रपट पुढील वर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सालार सोबत, प्रभास प्रोजेक्ट के सारख्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये देखील दिसणार आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण देखील आहेत.

टॅग्स :प्रभास