Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे आयुषमान खुराणाने तडकाफडकी सोडली मुंबई ? उलट-सुलट चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 13:19 IST

सोशल मीडियापासून दूर असल्याने चाहत्यांना त्याचे अपडेट्स किंवा फोटो तसंच व्हिडिओ किंवा त्याच्याशी निगडीत कसलीच अपडेट मिळत नसल्यामुळे त्याचे चाहते काहीसे हिरमुसलेले आहेत. 

आपल्या अभिनयाने रसिकांसह समीक्षकांचीही मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे अभिनेता आयुषमान खुराणा. 'विक्की डोनर' या पहिल्या सिनेमापासून ते अगदी 'बधाई हो' या सिनेमापर्यंतच्या त्याच्या प्रत्येक भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या. मात्र आयुषमान खुराणा गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुषमान खुराणा सोशल मीडियावरूनही गायब आहे. सोशल मीडियापासून ब्रेक घेतला असल्याचे माहिती समोर येत आहे.. सोशल मीडियापासून दूर असल्याने चाहत्यांना त्याचे अपडेट्स किंवा फोटो तसंच व्हिडिओ किंवा त्याच्याशी निगडीत कसलीच अपडेट मिळत नसल्यामुळे त्याचे चाहते काहीसे हिरमुसलेले आहेत. 

सोशल मीडियापासून दूर राहत तो त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत असल्याचे कळतंय. सध्या तो आगामी प्रोजेक्टची तयारी करत आहे. त्यासाठी तो त्याच्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेत आहे. म्हणूनच सोशल मीडियापासून तो काहीसा दूर असला तरी  चाहत्यांची लवकरच  प्रतीक्षा संपणार असून तो एका वेगळ्या भूमिकेतू रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे रसिकांची प्रतिक्षा चांगलीच फळाला येणार आहे.

आयुषमान काम करत असलेला सिनेमात एक लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. 'केदारनाथ' आणि 'काय पो छे' सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक कपूर सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात आयुषमानच्या लूकमध्येही मोठा बदल करण्यात येणार आहे. आजपर्यंत त्याला कोणीच अशा रूपात पाहिलेले नाही अशा रूपात तो दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याला पाहून चाहतेही आवाक होतील अशा रूपात तो रसिकांच्या समोर येणार आहे. त्यामुळे तसा लूक मिळवण्यासाठी तो त्याच्या बॉडीवर प्रचंड मेहन करत आहे. 

आयुष्यमानच्या इन्स्टाग्रामपेजवर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला त्याचे वेगवेगळे डॅशिंग लूक पाहायला मिळतील किंवा मग जाहीरातींसाठी केलेल्या लूक्समध्ये तो दिसेल. त्यामुळे आता त्याला जे रूप मिळणार आहे. ते पाहून चाहते काय रिएक्शन देतात हे पाहण्याची आयुषमानही उत्सुकता आहे. त्यामुळे सध्याचे कोणतेच लूक्स त्याने सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. कोणालाही याबाबत कानोकान खबर लागू नये म्हणून सगळी माहिती गुप्तता पाळण्यात आली आहे.

इतकेच काय तर त्यासाठी त्याने मुंबईदेखील सोडले आहे. तो सध्या मुंबईत नसून आपल्या घरी चंदीगढ मध्ये राहतोय. जर तो मुंबईत राहिला असता तर स्वतःसाठी त्याला वेळ मिळालाच नसता. शूटिंग, मीटिंग, रीडिंग आणि त्यात मीडिया फोटोग्राफरनेही त्याला घेरले असते. आणि त्याचे ट्रांसफॉर्मेशन जगासमोर आले असते. हवी तशी गुप्तता पाळली गेली नसती. त्यामुळे आगामी काळात आयुषमान चाहत्यांना नेमके कशाप्रकारे सरप्राईज देणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.  

टॅग्स :आयुषमान खुराणा