Join us
Daily Top 2Weekly Top 5

जगातली ही गोष्ट सर्वात कठीण, आई-वडिलांनी शिकवलेल्या गोष्टीचा आयुषमान खुरानाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 16:16 IST

आयुष्मान खुरानाचा चाहतावर्ग मोठा आहे. तो अभिनेता म्हणून टॅलेंटेड आहेच शिवाय तो उत्तम गायकही आहे.

अभिनेता आयुषमान खुराना (Ayushman Khurana) सध्या 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) मुळे चर्चेत आहे. सगळीकडे फिरत तो प्रमोशन करतोय. या दुसऱ्या भागात त्याची अनन्या पांडेसोबत जोडी जमली आहे.   'ड्रीम गर्ल २' या सिनेमात आयुषमान मुख्य भूमिकेत आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्लचा हा सीक्वेल आहे. या चित्रपटात आयुषमान दुहेरी भूमिकेत आहे. आयुषमान या चित्रपटात स्त्री व्यक्तिरेखा साकारतानाही दिसणार आहे. आयुष्मानचा लुक पाहून चाहते सिनेमा पाहण्यासाठी फारच उत्सुक झालेत. आयुष्मानची सिनेमा करायची स्टाईल वेगळी आहे.

आयुषमानच्या यशात सिंहाचा वाट त्याच्या आई-वडिलांचा आहे. याबाबत नुकताच अभिनेत्याने खुलासा केला. आयुषमान म्हणाला की, “माझ्या आई-वडिलांनी नेहमी माझ्यामध्ये एक गोष्ट रुजवण्याचा प्रयत्न केला ती म्हणजे लोकांचा विश्वास जिंकणे ही आजवरची सर्वात कठीण गोष्ट आहे आणि एकदा तुम्ही तो जिंकला की, तो विश्वास कधीही तोडू न देण्याची जबाबदारी माझी आहे. लोकांना निराश न करणे ही देखील एक मोठी जबाबदारी आहे.''

आयुष्मान खुरानाचा चाहतावर्ग मोठा आहे. तो अभिनेता म्हणून टॅलेंटेड आहेच शिवाय तो उत्तम गायकही आहे. त्याची गोष्टच वेगळी आहे. आयुष्मानने बधाई हो, ड्रीम गर्ल, बाला, दम लगा के हैशा, विकी डोनर यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये  भूमिका साकारल्या आहेत.  'ड्रीम गर्ल 2' मध्ये आयुष्मानने महिलेच्या रुपात दिसणार आहे. 'ड्रीम गर्ल'चा हा सिक्वल आहे. २५ ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज होतोय. यामध्ये अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, विजय राज यांच्यासह अनेक कलाकार आहेत. 

टॅग्स :आयुषमान खुराणा