Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ayushmann Khurrana : 'बाबा खूप लांब आणि....', वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला आयुषमान खुराना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 11:30 IST

सोशल मीडियावर त्याने एक भावूक पोस्ट आणि काही फोटो शेअर केले आहेत.

अभिनेता आयुष्मान खुरानावर यांच्या वडिलांचं 19 मे रोजी यांचं निधन झालं. आयुषमानचे वडील पंडीत पी खुराना यांचं चंदीगड येथील रुग्णालयात उपचार दरम्यान ह्रदयविकारच्या झटक्यानं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्या पूर्णपणे खचला आहे. सोशल मीडियावर त्याने एक भावूक पोस्ट आणि काही फोटो शेअर केले आहेत. 

वडिलांच्या निधनानंतर आता आयुष्यमानने पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली आहे. आयुषमानने आई, भाऊ आणि संपूर्ण कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये संपूर्ण खुराना कुटुंबीय पंडीत पी खुराना यांच्या फोटोला नमस्कार करताना दिसत आहे.

आयुषमानने लिहिले आहे की, 'आईची काळजी घ्यायची आहे आणि कायम तिच्यासोबत राहायचं आहे. वडिलांसारखं बनायला आपल्या वडिलांपासून खूप लांब जावं लागतं. पहिल्यांदाच असं वाटत आहे की, बाबा खूप लांब आणि आमच्या खूप जवळ आहेत.' याचबरोबर आयुषमानने त्याच्या वडीलांचे आभारही मानले आहेत.

आयुषमान खुरानाचे वडील पी. खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषी होते. त्यांनी या क्षेत्रात सुमारे 34 पुस्तके लिहिली आणि खूप प्रसिद्धी मिळवली. पी. खुराणा यांनाही वास्तुशास्त्राचे चांगले ज्ञान होते. 

टॅग्स :आयुषमान खुराणासेलिब्रिटी