Join us

आयुषमान म्हणतोय,‘गजब का हैं दिन...!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2016 15:43 IST

‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातलं ‘गजब का हैं दिन देखो जरा...’ हे गाणं आठवतंय का? ज्यात आमिर खान आणि ...

‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातलं ‘गजब का हैं दिन देखो जरा...’ हे गाणं आठवतंय का? ज्यात आमिर खान आणि जुही चावला हे एका जंगलात रस्ता चुकलेले असतात. तेव्हा त्यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे अतिशय रोमँटिक गाणे वारंवार ऐकले तरी ऐकावेसेच वाटते.असंच काहीसं होतंय म्हणे आयुषमान खुरानाला. दक्षिण मुंबईत तो ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ परिणीती चोप्रासोबत ‘गजब का हैं दिन..’ हे गाणं म्हणतोय. तुम्ही असा विचार कराल की कसे काय? तर ते दोघे सध्या ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटासाठी शूटींग करत आहेत.आयुषमानने या गाण्याची एक क्लिप सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केली आहे. या क्लिपला कॅप्शन देण्यात आलेय की,‘गजब का हैं दिन इन साऊथ बॉम्बे विथ माय बेस्टी..’