Join us  

आयुष शर्मा ह्या अभिनेत्यासोबत करणार काम, दिसणार गँगस्टरच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 5:13 PM

निर्माती प्रेरणा अरोराचा आगामी चित्रपट एका गँगस्टरच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटात आयुष शर्मा दिसणार आहे.

ठळक मुद्देआयुष शर्मा दिसणार संजय दत्तसोबत रुपेरी पडद्यावरआयुष शर्मा साकारणार गँगस्टरच्या भूमिकेत

संजूबाबाचा म्हणजेच संजय दत्तचा गँगस्टर लूक वास्तव चित्रपटात सगळ्यांनीच पाहिला. या चित्रपटासाठी संजय दत्तला पुरस्कार देखील मिळाला. आता तो पुन्हा एकदा गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्माती प्रेरणा अरोराचा आगामी चित्रपट एका गँगस्टरच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटात आता आणखीन एका अभिनेत्याचे नाव जोडले गेले आहे. हा अभिनेता म्हणजे लवयात्री चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा आयुष शर्मा.

अभिनेता आयुष शर्माला या चित्रपटासाठी फायनल केले आहे. संजूबाबाबरोबरच आयुषही या चित्रपटात गँगस्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अहमद खान व स्टुडिओ फाइव्ह एलिमेंट्स करणार आहेत. सू्त्रांच्या माहितीनुसार, हा अंडरवर्ल्ड अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. हा सिनेमा संजय दत्त व आयुष शर्माने साईन केला आहे आणि लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. अद्याप या चित्रपटाचे शीर्षकदेखील ठरलेले नाही.या चित्रपटाबाबत निर्माती प्रेरणा अरोरा म्हणाल्या की, हा चित्रपट अंडरवर्ल्डच्या युगात घेऊन जाणार आहे. या चित्रपटात भरपूर अॅक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी संजय दत्तपेक्षा चांगला दुसरा कलाकार कुणीच असू शकत नाही. आयुष शर्मा रुपेरी पडद्यावर खूप चांगला दिसतो. त्याचा पहिला चित्रपट लवयात्रीमधील आयुषचा स्क्रीनवरील वावर खूप चांगला वाटला. त्यामुळे त्याची या चित्रपटासाठी निवड केली. हा सिनेमाच्या चित्रीकरणाला मे, २०१९मध्ये सुरूवात होणार आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खऱ्या आयुष्यातील डॉन करीम लाला व त्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण भूमिकांवर आधारीत हा चित्रपट आहे. संजय दत्त या सिनेमात करीमची भूमिका करणार आहे. संजय दत्तने करियरमध्ये कित्येक गँगस्टर चित्रपटात काम केले आहे. सध्या संजय दत्त पानीपत व कलंक चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. 

टॅग्स :आयुष शर्मासंजय दत्त