आयुष शर्मा अन् वरीना हुसैनची ‘लवरात्रि’ सुरु! पाहा पोस्टर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 13:46 IST
सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा आणि वरीना हुसैन यांच्या ‘लवरात्रि’ या सिनेमाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. आज व्हॅलेन्टाईन ...
आयुष शर्मा अन् वरीना हुसैनची ‘लवरात्रि’ सुरु! पाहा पोस्टर!
सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा आणि वरीना हुसैन यांच्या ‘लवरात्रि’ या सिनेमाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. आज व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आलेय. या पोस्टरमध्ये ‘कॅडबरी गर्ल’ वरीना हुसैन व आयुष शर्मा दोघेही दांडिया खेळताना दिसताहेत. आयुषप्रमाणेच वरीनाचाही हा डेब्यू सिनेमा आहे. सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर पाहता, एक गोष्ट तर स्पष्ट जाणवतेय, ती म्हणजे वरीना व आयुष दोघांचीही जोडी प्रचंड रिफ्रेशिंग वाटतेय. दोघांचीही केमिस्ट्रीही जमून आलीय. ‘लवरात्रि’च्या या पोस्टरला लोकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता, ही जोडी भविष्यात हिट ठरणार, असे मानले जात आहे. अभिराज मिनावाला हा चित्रपट दिग्दर्शित करताहेत. या चित्रपटात एक गुजराती लव्हस्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे.या चित्रपटात वरीना एका बेले डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुषबद्दल तसेही तुम्हाला ठाऊक आहेच. सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा आयुष हा पती. गेल्या अनेक दिवसांपासून आयुष बॉलिवूड डेब्यू करणार, अशी चर्चा होती.ALSO READ : ‘लवरात्रि’ची हिरोईन वरीना हुसैनचा हा व्हिडिओ पाहायला विसरू नका!वरीनाचे म्हणाल तर तिचे वडिल इराकी तर आई अफगाणी आहे. वरीना न्यूयॉर्क फिल्म अॅकेडमीतून बाहेर पडलेली आहे. यापूर्वी अनेक जाहिरातीत हा सुंदर चेहरा दिसला आहे. २०१३ मध्ये तिने मॉडेलिंग सुरु केले. दिल्लीत राहणारी वरीना अलीकडे मुंबईत शिफ्ट झालीय. अलीकडे वरीना कॅडबरी सिल्कच्या जाहिरातीत दिसली होती. हीच जाहिरात बघून सलमानने वरीनाला आयुष्यच्या अपोझिट कास्ट करण्याचा निर्णय घेतला. सलमानने अगदी आगळ्या वेगळ्या अंदाजात वरीनाची ओळख करून दिली होती. ‘‘मुझे लडकी मिल गई’असे ट्विट त्याने केले होते. त्याचे हे ट्विट वाचून सलमान लग्न करणार, इथपर्यंत चर्चा रंगली होती. अखेर सलमानला मिळालेली ही ‘लडकी’ आयुषची हिरोईन असल्याचे स्पष्ट झाले होते.