आयशा टाकियाने केले टीकाकारांचे तोंड बंद; म्हटले ‘लोकांना ही सवयच’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 15:55 IST
गेल्या गुरुवारी मुंबई येथे आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये बघावयास मिळालेली अभिनेत्री आयशा टाकिया हिच्या बदलेल्या लूकवरून सोशल मीडियावर टीकेची ...
आयशा टाकियाने केले टीकाकारांचे तोंड बंद; म्हटले ‘लोकांना ही सवयच’
गेल्या गुरुवारी मुंबई येथे आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये बघावयास मिळालेली अभिनेत्री आयशा टाकिया हिच्या बदलेल्या लूकवरून सोशल मीडियावर टीकेची झोड उडविली गेली होती. परंतु आयशाने आता या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले असून, इतरांमध्ये खोड काढणे ही काही लोकांची सवयच असल्याचे म्हटले आहे. आयशा मुंबई येथे एका रेस्टॉरंट लॉचिंग कार्यक्रमात पती फरहान आजमी याच्यासोबत बघावयास मिळाली होती. या इव्हेंटमधील आयशाचे काही फोटो सोशल मीडियावर येताच नेटिझन्सने तिच्या लूकवरून ट्रोल करायला सुरुवात केली. आयशाचे ओठ सुजलेले असल्याचे बघावयास मिळत असून, चेहरा पूर्णत: प्लॅस्टिकचा दिसत आहे. आता आयशा स्वत:ला आरशात बघण्याची हिंमत करणार काय? अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या कमेण्ट शेअर केल्या गेल्या. मात्र या कमेण्ट आयशाच्या काही पचणी पडल्या नाहीत. तिने लगेचच इन्स्टाग्रामवर एक कोट शेअर करून, ‘तुम्ही कितीही चांगले असला तरी, काही लोक तुमच्यातील खोड आणि कमतरता काढण्याचा प्रयत्न करतीलच, असे उत्तर दिले. -यावेळी आयशाने तिचा एक सेल्फी शेअर करीत लिहिले की, आपण अशा समाजात राहात आहोत, जेथील लोक कोणाविषयीही त्याचे मत तयार करून त्या व्यक्तीला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टींची सवय करून घ्यायला हवी. आपण जसे आहोत, त्यावर तुम्हाला गर्व असायला हवा. स्वत:वर प्रेम करायला शिका, असेही तिने म्हटले. आयशाने ‘डोर, सलाम-ए-इश्क, टारझन आणि वॉण्टेड’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. तिने २००९ मध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी याच्याशी विवाह केला आहे. २०१३ मध्ये ती एका मुलाची आई बनली आहे. आयशाने २००४ मध्ये ‘टारझन : द वंडर कार’ या सिनेमातून तिच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. अब्बास मस्तान यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात आयशाची दमदार भूमिका होती. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता.