Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भट्टने लिव इन रिलेशन अन् मुले जन्माला घालण्यावरून केले हे वक्तव्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 20:50 IST

सध्या अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगताना दिसत आहेत. दर दोन दिवसाला दोघे कुठे ...

सध्या अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगताना दिसत आहेत. दर दोन दिवसाला दोघे कुठे ना कुठे बघावयास मिळतात. तसेच दोघे आगामी ‘बह्मास्त्र’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत रणबीरने आलियासोबतचे नाते कन्फर्म केले होते. त्याचबरोबर आलियादेखील इशारो-इशारोंमध्ये रणबीरवर प्रेम करीत असल्याचे सांगत आहे. परंतु अद्यापपर्यंत तिने स्पष्टपणे याबाबतचा खुलासा केला नाही. दरम्यान, आलिया आणि रणबीरच्या बोलण्यांवरून असेच दिसून येत आहे की, दोघांना त्यांच्यातील नाते लॉन्ग लाइफ टिकवायचे आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने सांगितले की, ‘सध्यातरी मी लग्नाविषयी विचार करीत नाही. खरं सांगायचे झाल्यास यावर मी सतत विचार करावा, असे माझ्या स्वभावातच नाही. मी जे करायचे तेच करते. मी एक रॅँडम मुलगी आहे. मी कुठलाही विचार न करता निर्णय घेत असते. कदाचित लोकांना असे वाटत असेल की, मी वयाच्या तिशीनंतर लग्न करणार. परंतु मी त्या अगोदर लग्न करून इतरांना सरप्राइज देऊ शकते. मला माझ्या पार्टनरसोबत राहण्यासाठी लिव इनची गरज आहे. लग्नानंतर तर मी त्याच्यासोबत राहणारच. वास्तविक आलिया लिव इन रिलेशनशिपवर फारसा विश्वास ठेवत नाही. यावरच  ती पुढे सांगतेय की, जेव्हा मला असे वाटेल की, मी आता मुलांना जन्म घालायला हवा तेव्हा मी त्याचाच विचार करणार. मला सुरुवातीपासून असे वाटत आले आहे की, मुलांसाठी मी लग्न करायला हवे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा लग्नही करणार अन् मुलांना जन्मही देणार, असेही आलियाने स्पष्ट केले. आलियाचे हे विचार ऐकून आता रणवीर काय प्रतिक्रिया देईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.