अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची बातमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सहा वर्षांच्या नात्यानंतर ते दोघे वेगळे झाले. नुकतेच ते ‘होमबाउंड’ (Homebound) चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये समोरासमोर आले. ब्रेकअप नंतर पहिल्यांदाच ते अशा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. अचानक एकमेकांसमोर आल्यानंतर अर्जुन-मलायका यांनी काय केलं, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
अर्जुन-मलायका ब्रेकअपनंतर एकत्र, काय घडलं?
‘होमबाउंड’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला अर्जुन-मलायका एकत्र आले होते. या भेटीमुळे दोघंही थोडेसे अवघडले होते. त्यांच्या चेहऱ्यावरुन ते स्पष्ट दिसतंय. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये दिसतं की, मलायका आणि अर्जुन अचानक एकमेकांसमोर आले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. पुढे अर्जुनने मलायकाशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण ती त्याला टाळायचा प्रयत्न करत होती. त्यानंतर मलायका मागे जाऊन नेहा धुपियाशी बोलण्यात मग्न झाली.
हा व्हिडीओ पाहून, ब्रेकअप झाल्यानंतर अर्जुन-मलायका एकमेकांचे मित्र म्हणून राहिलेले नाहीत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा जवळपास ६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही आपल्या नात्याचा कायमच सर्वांसमोर जाहीर खुलासा केला होता, पण २०२४ च्या सुरुवातीलाच त्यांचं ब्रेकअप झालं. त्यांच्या ब्रेकअपचे कारण मात्र दोघांनीही अजून सांगितलेलं नाहीये. दरम्यान मलायकाच्या बाबांचं जेव्हा काही महिन्यांपूर्वी निधन झालं तेव्हा अर्जुन या दुःखद काळात तिच्या कुुटुंबाच्या सोबत होता.