Avneet Kaur Plastic Surgery : चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी हा ट्रेंड खूप सामान्य झाला आहे. प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी, जान्हवी कपूर, आणि अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी नाक, ओठ (लिप फिलर्स) किंवा चेहऱ्याच्या रचनेत बदल करण्यासाठी शस्त्रक्रियेचा आधार घेतल्याचे बोलले जाते. अशातच सोशल मीडिया सेन्सेशन आणि अभिनेत्री अवनीत कौर हिनंदेखील प्लास्टिक सर्जरी किंवा बोटॉक्स केल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चांवर आता अवनीतने अखेर प्रतिक्रिया दिली आहे.
अवनीतच्या लूकमध्ये झालेल्या बदलांवरून काही जणांनी तिने बोटॉक्स किंवा प्लास्टिक सर्जरी केल्याचा दावा केला होता. मात्र आता तिने या सर्व चर्चांना उत्तर दिलं आहे. एका मुलाखतीत बोलताना अवनीत म्हणाली की, "मी अशा कमेंट्सकडे फार लक्ष देत नाही. पण लोकांना असं वाटत असेल तर त्यांनी माझ्या लहानपणीच्या आणि आताच्या फोटोची तुलना करावी. वयानुसार चेहऱ्यात बदल होणं ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्ती वय वाढत असताना बदलते आणि ते अगदी सामान्य आहे", असं तिने स्पष्ट केलं.
अवनीतने पुढे स्पष्ट केले की, तिचे नाक, डोळे आणि इतर वैशिष्ट्ये आजही पूर्वीसारखीच आहेत. तिच्या चेहऱ्यावरील तीळाचा संदर्भ देत ती म्हणाली, "माझा हा तीळ आजही तिथेच आहे, जिथे तो आधी होता. माझ्या सौंदर्याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या आईला देते. मला जे काही मिळालं आहे, ते नैसर्गिकरित्या मिळालं आहे".
वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, अवनीत कौर नुकतीच शांतनु माहेश्वरीसोबत 'लव्ह इन व्हिएतनाम' या चित्रपटात झळकली होती. राहत शाह काझमी दिग्दर्शित हा चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये तिने 'सिमी'ची भूमिका साकारली होती. आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे अवनीत कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
Web Summary : Avneet Kaur responds to speculation about plastic surgery, attributing changes in her appearance to natural aging. She dismisses claims of Botox, suggesting comparing childhood photos. Kaur credits her mother for her looks and emphasizes her features remain unchanged.
Web Summary : अवनीत कौर ने प्लास्टिक सर्जरी की अटकलों का जवाब देते हुए अपनी उपस्थिति में बदलाव का श्रेय प्राकृतिक उम्र बढ़ने को दिया। उन्होंने बोटोक्स के दावों को खारिज करते हुए बचपन की तस्वीरों की तुलना करने का सुझाव दिया। कौर ने अपनी मां को अपनी सुंदरता का श्रेय दिया और जोर दिया कि उनकी विशेषताएं अपरिवर्तित हैं।