Join us

आभाची भूमिका ‘टफ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 12:02 IST

प्रियंका चोप्रा हिने ‘गंगाजल’ या तिच्या आगामी चित्रपटात एसपी आभा माथुरची भूमिका साकारली आहे. प्रियंकाने आभा माथूरच्या माध्यमातून महिला ...

प्रियंका चोप्रा हिने ‘गंगाजल’ या तिच्या आगामी चित्रपटात एसपी आभा माथुरची भूमिका साकारली आहे. प्रियंकाने आभा माथूरच्या माध्यमातून महिला पोलिसाची अभिव्यक्ती जाणून घेतली. प्रियंका म्हणते,‘ महिला पोलिसांच्या कार्याला माझा सलाम. खरंतर, आभाची भूमिका माझ्यासाठी अत्यंत कठीण होती. प्रकाश झा आणि मी महिलाशक्तीविषयी चर्चा करत होतो त्यावेळी आम्हाला महिलाशक्तीचा गौरव आणि सत्कार करावासा वाटला. स्त्रीजगतात महिला पोलिसासोबतच सर्वसाधारण महिला देखील तितकीच पॉवरफुल व्हायला हवी. आभा माथुर हिच्या भूमिकेप्रमाणे प्रत्येक महिला पोलिस असावी. ’ गंगाजल हा चित्रपट महिला पोलिस आणि महिलांसाठी अगदीच प्रेरणादायी असेल.