Join us

​‘जय गंगाजल’मधील माझी भूमिका प्रेक्षकांना आवडेल- मानव कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 05:41 IST

‘जय गंगाजल’ या चित्रपटातील माझी भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल, असे बॉलिवूड अभिनेता मानव कौल सांगत सुटलाय. प्रकाश झा यांच्या ...

‘जय गंगाजल’ या चित्रपटातील माझी भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल, असे बॉलिवूड अभिनेता मानव कौल सांगत सुटलाय. प्रकाश झा यांच्या या आगामी चित्रपटात मानवने खलनायक साकारला आहे. प्रियंका चोपडा यात मुख्य भूमिकेत आहे. आपल्या भूमिकेविषयी मानवला किती बोलू अन् किती नको, असे झालेय. तो म्हणाला, या चित्रपटात मी बबलू पांडेची भूमिका साकारली आहे. यापूर्वी मी कधीही इतकी भावनाप्रधान व्यक्तिरेखा साकारली नाही. ‘जय गंगाजल’मधील मी साकारलेला विलन लोकांना नक्की आवडेल.  प्रकाश झा सरांनी मला यात चित्रपटात संधी दिली. जणू ही भूमिका माझ्यासाठीच लिहिली गेलीय, असे मला वाटले. ही आव्हानात्मक भूमिका साकारणे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण मी हे आव्हान पेलले. आता मला माझ्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे, असे मानव म्हणाला. येत्या ४ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.