Join us

प्रेक्षकांना गृहित धरत नाही-इम्तियाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:28 IST

'त माशा'च्या माध्यमातून इम्तियाज अली यांनी प्रेक्षकांच्या सर्व विचारकक्षांना रूंदावले आहे. याविषयी इम्तियाज अली म्हणतात,' मला प्रेक्षकांना गृहित धरायला ...

'त माशा'च्या माध्यमातून इम्तियाज अली यांनी प्रेक्षकांच्या सर्व विचारकक्षांना रूंदावले आहे. याविषयी इम्तियाज अली म्हणतात,' मला प्रेक्षकांना गृहित धरायला आवडत नाही की त्यांना एका अशाप्रकारचेच चित्रपट पहावयास आवडतात. उलट, मला वाटते की, प्रेक्षकांनी तोच तोच विचार करण्यापेक्षा थोडा वेगळा विचार करायला शिकावे. प्रेक्षक निर्मात्यांपेक्षा जास्त हुशार असतात असे वाटते. वेद आणि तारा यांना प्रेक्षकांनी स्विकारले आहे हे खरंच खुप आनंददायी आणि भावनाविवश करणारे आहे. मला एक वयोवृद्ध बाई भेटली. ती म्हणाली,' तुम्ही याअगोदर हा चित्रपट बनवायला हवा होता. आता मला माझे आयुष्य जगणे कसे शक्य आहे?'