Join us
Daily Top 2Weekly Top 5

अथियाने घेतला भन्सालींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 13:09 IST

अभिनेत्री अथिया शेट्टीला सलमान खानने हिरो या चित्रपटाद्वारे लाँच केले. या चित्रपटाला जवळजवळ दोन वर्षं होत आले आहेत. पण ...

अभिनेत्री अथिया शेट्टीला सलमान खानने हिरो या चित्रपटाद्वारे लाँच केले. या चित्रपटाला जवळजवळ दोन वर्षं होत आले आहेत. पण या चित्रपटानंतर अथियाकडे एकाही चित्रपटाची ऑफर नाहीये. तिच्या या ढळमळत्या करियरला सावरण्यासाठी तिने दिग्दर्शक-निर्माता संजय लीला भन्साली याच्याकडे मदत मागितली असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साली यांच्यासोबत अथियाने तिच्या करिअरबाबत चर्चा केली असून त्यांच्याकडून सल्ला घेतला असल्याचे म्हटले जात आहे.