Join us

Athiya Shetty Video : ना टिकली, ना मंगळसूत्र..., नवी नवरी अथिया शेट्टीचं वागणं पाहून नेटकऱ्यांची सटकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 15:21 IST

Athiya Shetty Video : अथिया शेट्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) नुकतीच लग्नबंधनात अडकली. गेल्या २३ जानेवारीला अथियाने भारताचा क्रिकेटर केएल राहुल ( KL Rahul) याच्यासोबत लग्नगाठ बांधली.   खंडाळा येथील त्यांच्या फार्महाऊसवर हा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच. आता  अथियाचा लग्नानंतरचा व्हिडीओ व्हायरल होतोय. लग्नानंतर पहिल्यांदाच अथिया पब्लिकली दिसली.  तिचा व्हिडीओ व्हायरल झाला. पण हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

व्हिडीओत अथिया सलूनबाहेर पडताना दिसतेय. यावेळी ती डेनिम व शर्ट अशा एकदम कॅज्युअल लुकमध्ये आहे. पण लोकांना तिचा हा लुक आवडला नाही. नवीन नवरी असलेल्या अथियाच्या गळ्यात ना मंगळसूत्र होत ना, भांगेत सिंदूर, ना कपाळाला टिकली, ही गोष्ट अनेकांना खटकली. शिवाय अथियाचं वागणं पाहूनही नेटकरी भडकले. अथिया सलूनमधून बाहेर पडते. पापाराझी तिला लग्नाच्या शुभेच्छा देतात. पण अथिया त्यांच्याकडे दुर्लक्ष करत घाईघाईत सलून बाहेर पडते आणि थेट आपल्या गाडीत जाऊन बसते.या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत अथियाला ट्रोल केलं आहे.

“हिचा ॲटिट्युड तर पाहा. वडील इतके नम्र आहेत पण हिला भारीच गर्व,” अशी कमेंट एका युजरने केली. एका युजरने मजेशीर प्रतिक्रिया दिली. “लग्नानंतर यांच्या सासवा त्यांना गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर लावायला सांगत नसतील का? हे आमच्याच सासवांचं काम आहे का ? अशी सासू भेटावी म्हणून किती सोमवार करावे लागतात?”, अशी कमेंट या युजरने केली. 

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुलसुनील शेट्टीबॉलिवूड