Join us

Athiya Shetty-KL Rahulचं बाथरोबमधलं पहिलं फोटोशूट; चाहते म्हणाले Made for Each Other!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 18:19 IST

अण्णा सुनील शेट्टीच्या लेकीचं आणि जावयाचं बाथरोबमधलं पहिलं फोटोशूट चर्चेत आलं आहे. कॅमेऱ्यासमोर ही जोडी कमाल दिसतेय.

Athiya Shetty KL Rahul Photoshoot:  बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी क्रिकेटर केएल राहुलसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सध्या हे कपल एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. दरम्यान, अथिया शेट्टीने पती केएल राहुलसोबतच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली, ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये या जोडप्याचे जोरदार कौतुक केले जात आहे.

कपलने मॅगझिनसाठी केलेले फोटोशूट केएल राहुल आणि अथिया शेट्टीने लग्नापूर्वी वोग मॅगझिनच्या कव्हर फोटोशूटसाठी पोज दिली होती, ज्याचा फोटो आता समोर आला आहे. अथिया शेट्टीने इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती पती केएल राहुलसोबत दिसत आहे. दोघांनी लग्नाच्या एक महिना आधी हे फोटोशूट केल्याचे सांगितले जात आहे.

लूक आला चर्चेत फोटोमध्ये दिसत आहे की, अथिया शेट्टीने कमीत कमी मेकअपने आपलं लूक पूर्ण केला आहे. तिने बाथरोबसह हिरवा  पायजमा घातला आहे. तर केएल राहुल देखील राखाडी रंगाचा बाथरोब परिधान केलेला दिसत आहे. त्याने पत्नी अथियाच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसतो आहे. नवविवाहित कपलची ही जोडी कॅमेऱ्यासमोर कमाल दिसते आहे. फोटोमध्ये दोघेही परफेक्ट नवरा-बायको दिसत आहेत.

याआधी केएल राहुलने इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो पत्नी अथिया शेट्टीसोबत रोमँटिक अंदाजात दिसत होता. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की केएल राहुल आणि अथिया शेट्टी एकमेकांच्या प्रेमात आहेत.  हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुलसुनील शेट्टी