Join us

#AskSRK: 'पठाण' कुटुंबासोबत बघण्याच्या लायकीचा आहे का? चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं कडक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 17:02 IST

Pathaan, Shah Rukh Khan : गेल्या काही दिवसांपासून शाहरूख सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय झालेला दिसतोय. #AskSRK या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतोय...

Pathaan, Shah Rukh Khan : शाहरूख खान व दीपिका पादुकोणचा 'पठाण' उद्या २५ जानेवारीला चित्रपटगृहांत धडकणार आहे. त्याआधी शाहरूखचे चाहते क्रेझी झाले आहेत. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला जबरस्त प्रतिसाद मिळतोय. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय धमाका करतो, ते बघूच. पण सध्या शाहरूखने एका पाठोपाठ एक धमाके करतोय. होय, गेल्या काही दिवसांपासून शाहरूख सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय झालेला दिसतोय.

#AskSRK या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतोय. चाहते भन्नाट प्रश्न विचारत आहेत आणि किंगखान त्या प्रश्नांना तितकीच भन्नाट उत्तरं देतोय. सध्या त्याचीच चर्चा आहे. 'पठाण'च्या प्रमोशनसाठी यावेळी शाहरूखने वेगळा फंडा अवलंबला आहे. मीडियाला मुलाखती देण्याऐवजी तो सोशल मीडियावरून थेट चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतोय. #AskSRK सेशनद्वारे चाहत्यांशी हितगूज करतोय.

अशाच एका सेशनमध्ये एका चाहत्याने 'पठाण'च्या रिलीजच्या तोंडावर एक प्रश्न केला आणि शाहरूखने त्यावर कडक उत्तर दिलं. 'पठाण' कुटुंबासोबत पाहू शकतो का, सिनेमा त्या लायकीचा आहे का?, असा प्रश्न या चाहत्याने केला. यावर शाहरूखने त्याच्या शैलीत उत्तर दिलं. मी माझ्या कुटुंबासोबतच सिनेमा पाहिला, मला वाटतं तू पण बघू शकतोस..., असं उत्तर शाहरूखने दिलं. 

काही दिवसांपूर्वी यशराज स्टुडिओत खान कुटुंबासाठी 'पठाण'चं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. शाहरूखचा मोठा मुलगा आर्यन खान, लेक सुहाना खान, पत्नी गौरी खान सर्वांनी एकत्र हा सिनेमा पाहिला होता. 'पठाण' चित्रपटामधील बेशरम रंग हे गाणं रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी थेट 'पठाण'वर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. बेशरम गाण्यात दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद सुरू झाला होता. अद्यापही हा वाद शमलेला नाही.

टॅग्स :शाहरुख खानपठाण सिनेमा