Join us
Daily Top 2Weekly Top 5

​हृतिकबद्दल विचारल्यावर कंगना म्हणाली, सभ्य प्रश्न विचारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 22:24 IST

होय, ऐकता ते खरं आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंगना रानोट व हृतिक रोशन यांच्यातील वाद चांगलाच गाजतोय. हा वाद ...

होय, ऐकता ते खरं आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंगना रानोट व हृतिक रोशन यांच्यातील वाद चांगलाच गाजतोय. हा वाद निवळण्याची चिन्हेही नाहीत, असेच आताशा वाटू लागलेय. कंगनाने एका मुलाखतीत हृतिकला ‘सिली एक्स’ म्हटले आणि हृतिकने त्याचे उत्तर म्हणून कंगनाला कायदेशीर नोटीस बजावली. कंगनानेही कायदेशीर नोटीस धाडत, हृतिकला जशास तसे उत्तर दिले. यानंतर हृतिक व कंगना दोघेही एकमेकांवर बेछूट आरोप करताना दिसले. नुकत्याच झालेल्या आयफा अवार्ड दरम्यान हृतिकला या वादाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. कंगनासोबतचा वाद तू मागे सोडला का, असे त्याला विचारले गेले. यावर मी काहीही मागे सोडलेले नाही. सगळे काही लवकरच तुमच्यासमोर येईल, असे बोचरे उत्तर हृतिकने दिले होते. आता यावर कंगना कशी रिअ‍ॅक्ट होते, हे तर बघायचेच होते. आज एका कार्यक्रमात कंगनाला याबद्दल एका पत्रकाराने छेडलेच...पण कंगना हृतिकसोबतच्या वादावर बोलण्याच्या मूडमध्ये नव्हतीच..काहीतरी सभ्य प्रश्न विचारा, असे म्हणून हा प्रश्न तिने अक्षरश: टरकावून लावला..सभ्य प्रश्न ??? म्हणजे हृतिकबद्दल बोलणे कंगना असभ्यपणाचे समजते की काय??