Join us

अक्षय कुमारने शेअर केला असिनच्या मुलीचा पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 12:46 IST

असिन आणि तिचा नवरा राहुल शर्मा यांनी 24 ऑक्टोबरला  एक गुडन्युज देत सगळ्यांना सरप्राईज केले. दोघांच्या घरी एक चिमुकल्या ...

असिन आणि तिचा नवरा राहुल शर्मा यांनी 24 ऑक्टोबरला  एक गुडन्युज देत सगळ्यांना सरप्राईज केले. दोघांच्या घरी एक चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. राहुलने एक ऑफिशियल स्टेटमेंट देत या गोष्टीची माहिती दिली. गेल्या वर्षी 19 जानेवारी 2016ला दिल्लीमध्ये  मायक्रोमॅक्स कंपनीचा को-फाऊंडर असलेल्या राहुल शर्मासोबत विवाह बंधनात अडकत सगळ्यांना आश्चर्याया धक्का दिला होता. असिनने आधी राहुलसोबत चर्च मध्ये आणि नंतर हिंदु पद्धतीनुसार लग्न केले होते. राहुल आणि असिनची ओळख अक्षय कुमारने करुन दिली होती. अक्षयकुमार आणि असिन हे एकमेकांचे चांगले मित्र-मौत्रिण आहेत.  नुकताच अक्षय कुमारने असिनच्या मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या मैत्रिणीच्या मुलीला हातात घेतल्याचा आनंद अक्षय कुमारच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे. अक्षयने फोटो शेअर करत राहुल आणि असिनचे अभिनंदन केले आहे.  लग्ननंतर असिन चित्रपटातून गायब झाली आहे. ऐवढेच नाही तर तिने प्रेग्नेंसीदरम्यानचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. लग्ननंतर आपले काही खासक्षण असिनने सोशल मीडियावर फॅन्ससोबत शेअर केले होते. मात्र प्रेग्नेंसू दरम्यान ती सोशल मीडियावरुन गायब दिसली. असिन आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. क्वीन ऑफ कॉलिवूडच्या नावाने असिनला ओळखले जाते. आमिर खानसोबत असिनने गजिनीमध्ये काम केले होते. याचित्रपटानंतर तिला सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी देखील मिळाली.  असिनने अक्षयसोबत हाऊसफुल २, खिलाडी ७८६ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय आणि असिनची खूप चांगली मैत्री जमली होती. असिनने 2015 मध्ये आलेल्या ऑल इज वेल या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत शेवटची दिसली होती. त्यानंतर मात्र तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आणि राहुल शर्मासोबत संसार थाटला. असिन आपल्या करिअरची सुरुवात दक्षिणात्य चित्रपटातून केली. आसिन उद्या 32 व्या वर्षात पदार्पण करणार आहे.