Join us

असीन-राहुल ‘मेड फॉर इच अदर’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 09:22 IST

काही महिन्यांपूर्वी असीन आणि तिचा जवळचा मित्र राहुल शर्मा हे एकमेकांसोबत विवाहाच्या बंधनात अडकले. 

काही महिन्यांपूर्वी असीन आणि तिचा जवळचा मित्र राहुल शर्मा हे एकमेकांसोबत विवाहाच्या बंधनात अडकले. त्यांनी त्यांच्या आयुष्याचे नवे पर्व सुरू केले. त्यांचे रोमँटिक फोटोज, सेल्फी असीन सातत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.असाच तिने नुकताच एक फोटो अपलोड केला आहे. हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की, खरंच ते दोघे ‘मेड फॉर इच अदर’ आहेत. यात ती पती राहुल शर्मा सोबत वेळ घालवतांना दिसत आहे. त्याला तिची किती काळजी आहे हे या फोटोवरून तुम्हाला कळेल.असीन आणि राहुल यांनी साऊथ अफ्रिकेत सफारी एन्जॉय केल्या. ते त्यांचे वैवाहिक आयुष्य आनंदाने जगत असल्याची कबूली त्यांनी दिली आहे.