Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशोक कुमार यांच्या प्रेमप्रकरणांची ‘झुक झुक गाडी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 12:15 IST

हिंदी सिनेमातील आयकॉनिक पर्सनॅलिटी म्हणून अशोक कुमार यांच्याकडे पाहिले जाते. विविध राष्ट्रीय आणि चित्रपट पुरस्कार त्यांनी मिळविले. अशोक कुमार ...

हिंदी सिनेमातील आयकॉनिक पर्सनॅलिटी म्हणून अशोक कुमार यांच्याकडे पाहिले जाते. विविध राष्ट्रीय आणि चित्रपट पुरस्कार त्यांनी मिळविले. अशोक कुमार यांनी नकारात्मक भूमिकाही केल्या. अशा विविध भूमिका करताना त्यांच्या आयुष्यातही प्रेमप्रकरणे आलीच. पत्नी शोभा देवी यांच्यानंतरही त्यांच्या आयुष्यात अनेक जणी आल्या. अशोक कुमार यांच्या आयुष्यात घडलेल्या या विविध आठवणींचा घेतलेला धांडोळा...शोभा देवीअशोक कुमार यांनी २० एप्रिल १९३६ साली शोभा देवी यांच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नापूर्वी अशोक कुमार यांचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडण्यात आले होते. त्यांचे हे लग्न ५० वर्षांहून अधिक काळ टिकले. या दोघांना प्रिती आणि अरुप अशी दोन मुलेही आहेत. शोभा देवी यांच्या मृत्यूनेच या दोघांची ताटातूट केली.देविका राणी१९३६ साली अशोक कुमार हे देविका राणी यांच्यासोबत काम करीत होते, तेंव्हापासून या दोघांमधील नातेसंबंध होते. या दोघांचे आॅनस्क्रीन आणि आॅफस्क्रीन संबंधही चांगले होते. या दोघांनी १० चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर देविका राणी यांनी लग्न केले, अर्थात त्यांचे अशोक कुमार यांच्याविषयीचे प्रेम कायम राहिले.मधुबालाअशोक कुमार हे दिसायला देखणे असल्याने अनेक मुली त्यांच्यावर भाळत. सुरुवातीला म्हणजे १९४३ साली त्यांची ब्युटी क्विन मधुबाला यांच्याशी भेट झाली. किस्मत या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची ओळख झाली, त्याचे रुपांतर आकर्षणात झाले. अर्थात हे एका चित्रपटापुरतेच मर्यादित होते. हा चित्रपट संपला आणि ते पुन्हा वेगळे झाले. महल या चित्रपटाच्या निमित्ताने सहा वर्षानंतर दोघे एकत्र आले होते. अशोक कुमार यांच्या चाहत्यांना देखील ही जोडी खूप आवडली.नलिनी जयवंतमधुबाला सोबतच त्या काळातील अभिनेत्री नलिनी जयवंत यांच्याशी अशोक कुमार यांचे संबंध असल्याचे सांगण्यात येत होते. १९५० साली हे दोघे एका चित्रपटात काम करीत असताना या अफवांना अधिक ऊत आला होता. अर्थात मधुबाला यांच्याप्रमाणेच चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर या दोघांमधील अंतर वाढले. त्याच काळात त्यांच्या भूमिकांमुळे ते लोकांमध्ये अधिक लोकप्रिय झाले.