Join us

Bharti Jaffery: अशोक कुमार यांची मुलगी भारती जाफरीचं निधन, बॉलिवूडवर पुन्हा पसरली शोककळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 17:43 IST

भारती जाफरी यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांची मुलगी भारती जाफरी यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. भारती यांच्यावर मंगळवारी मुंबईतील चेंबूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भारती जाफरी यांच्या निधनाच्या बातमीने अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास भावुक झाल्या. भारती जाफरी यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे

भारती जाफरीने अनेक सिनेमांमध्ये काम केलंभारती जाफरी यांनी अनेक मोठ्या चित्रपटात काम केले होते. यामध्ये हजार चौरासी की माँ, सांसा, दमन: वैवाहिक हिंसाचाराचा बळी या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांतील भारती जाफरीचं काम सर्वांनाच आवडले होते. भारती जाफरी यांचं लग्न हमीद जाफरी यांच्याशी झाले होते. हमीद हे अभिनेता सईद जाफरी यांचा भाऊ आहेत. भारती यांच्या मुलीचे नाव अनुराधा पटेल आहे. 

भारती जाफरी यांचे वडील अशोक कुमार यांच्याबद्दल सांगायचे तर ते त्यांच्या काळातील महान कलाकारांपैकी एक होते. अशोक कुमार यांचे 10 डिसेंबर 2001 रोजी निधन झाले. अशोक कुमार यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  किशोर कुमार यांनी चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. किशोर कुमार हे एक उत्कृष्ट पार्श्वगायकही होते. त्यांच्या हिट चित्रपटांमध्ये हाफ तिकीट, दिल्ली का ठग, नया अंदाज, मन मौज, आशा, नौकरी, बाप रे बाप यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

टॅग्स :अशोक कुमारसेलिब्रिटी