आशिष विद्यार्थी यांनी बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी अनेक चित्रपटांत साकारलेला खलनायक प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. आशिष विद्यार्थी यांच्याविषयी आम्ही तुम्हाला आज एक खास गोष्ट सांगणार आहोत. त्यांनी हिंदी, तामीळ, कन्नड, मल्याळम, तेलगू, बंगाली, इंग्रजी, ओडिसा आणि मराठी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते केवळ एक चांगले अभिनेते नव्हे तर खूपच चांगले मोटिव्हेशनल स्पीकर देखील आहेत. त्यांनी चित्रपटांप्रमाणे मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यांना द्रोहकाल या त्यांच्या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात देखील आलेले आहे.
अतिशय सुंदर आहे आशिष विद्यार्थीची पत्नी, पाहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 11:30 IST
आशिष विद्यार्थी अनेक वर्षं बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाग असले तरी त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे.
अतिशय सुंदर आहे आशिष विद्यार्थीची पत्नी, पाहा तिचे फोटो
ठळक मुद्देआशिष विद्यार्थी यांचे लग्न एका अभिनेत्रीसोबत झाले आहे. त्यांची पत्नी ही बंगाली इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांचे लग्न अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआ यांच्यासोबत झाले असून राजोशी यांनी अनेक बंगाली मालिकांमध्ये काम केले आहे.