Asha Bhosle Last Live Performance : दशकानुदशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले (Asha Bhosle) यांचं काल दुर्दैवी निधन झालं. अंत्यसंस्कार आज, १३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत पार पडतील. या ठिकाणी त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला जाईल. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, अनेक राजकीय नेते आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. आशा यांच्या निधनानंतर, त्यांच्या अनेक जुन्या मुलाखती आणि व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत.
आशा भोसले या वयाच्या अखेरच्या टप्प्यातही मोठ्या उत्साहात काम करत राहिल्या. दुबईत झालेल्या एका लाईव्ह परफॉर्मन्समध्ये आशा यांनी करण औजलाचं 'तौबा तौबा' हे गाणं केवळ गायलंच नाही तर त्यावर हुक स्टेप करत उपस्थितांनाही थिरकायला लावलं होतं. ९१ व्या वर्षी त्यांचा हा उत्साह पाहून उपस्थित प्रेक्षक अक्षरशः थक्क झालेले. या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा त्यांचा शेवटचा Live परफॉर्मन्स (Asha BHosle Last Live Performance) ठरला आहे.
वयाच्या या टप्प्यावरही आशा भोसले या एक 'उत्कृष्ट परफॉर्मर' म्हणून रसिकांसमोर येत असत. त्यांच्या निधनानंतर, समाजातील सर्व स्तरांतील लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्यांच्या गाण्यांची आणि त्यांच्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत आहेत. आज जरी त्या आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या आवाजातील जादू आणि त्यांनी गायलेली असंख्य गाणी पिढ्यानपिढ्या संगीतप्रेमींच्या मनात जिवंत राहतील.
Web Summary : Asha Bhosle, the queen of melody, passed away. Her last live performance in Dubai, singing and dancing to 'Tauba Tauba,' went viral. Despite her age, her energy amazed the audience. Her funeral will be held with state honors as the music world mourns her loss.
Web Summary : सुर साम्राज्ञी आशा भोसले का निधन हो गया। दुबई में उनके अंतिम लाइव प्रदर्शन में, 'तौबा तौबा' पर उनका गाना और नृत्य वायरल हो गया। उनकी उम्र के बावजूद, उनकी ऊर्जा ने दर्शकों को चकित कर दिया। संगीत जगत में शोक के साथ उनका अंतिम संस्कार राजकीय सम्मान के साथ किया जाएगा।