Join us

ट्राफिकमध्येही ऐश आराध्याला शिकवते कविता ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 11:09 IST

 सध्या प्रत्येक आईला  एकच प्रश्न सतावतोय तो म्हणजे ऐश्वर्या रॉय बच्चन शूटिंग, आराध्याचे पालनपोषण हे सर्व कसे काय करू ...

 सध्या प्रत्येक आईला  एकच प्रश्न सतावतोय तो म्हणजे ऐश्वर्या रॉय बच्चन शूटिंग, आराध्याचे पालनपोषण हे सर्व कसे काय करू शकते? वेल, या प्रश्नाच उत्तर तिने फार सोपे करून सांगितले आहे. सर्वप्रथम तिने तिला सांभाळण्यासाठी कुठल्याही ‘नॅनी’ ला ठेवलेले नाही. तसेच तिला जसाही वेळ मिळतो ती तिला काहीतरी शिकवत असते. सर्वांत महत्त्वाची बाब अशी की, तिला आराध्याला तिच्या कोणत्याही चित्रपटाचा ट्रेलर, टीजर आणि चित्रपटाचे कथानक समजावून सांगण्याची गरज पडत नाही. तिला स्वत:ला समजून घेण्यासाठी ती वेळ देते. शूटिंग सुरू असताना आराध्या व्हॅनमध्येच थांबते. शूटिंगला येताना ऐश तिला झोपवते. आणि घरी जाताना रस्त्यात ट्रॅफिक लागते त्यावेळी ऐश तिला मुळाक्षरे आणि कविता शिकवत असते. वेल, ऐश्वर्या तू तर आई, कलाकार आणि उत्तम माणूस आहेस.Aishwarya