Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश म्हणते,‘बादशाहो’ साठी माझा पुढाकार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 11:15 IST

हिंदी चित्रपटसृष्टीत ऐश्वर्या रॉय बच्चन हिचे नाव उल्लेखनीय स्वरूपात घेतले जाते. तिच्या १८ वर्षांच्या सिनेकार्यकाळात तिने उत्तम चित्रपट, उत्तम ...

हिंदी चित्रपटसृष्टीत ऐश्वर्या रॉय बच्चन हिचे नाव उल्लेखनीय स्वरूपात घेतले जाते. तिच्या १८ वर्षांच्या सिनेकार्यकाळात तिने उत्तम चित्रपट, उत्तम अभिनय, प्रामाणिक प्रयत्न करून मिळवले, नावाजलेही आहेत.तिच्याकडे तिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ती अशी की, एका मुलाखतीदरम्यान बोलताना ती सांगते,‘ मला अजय देवगण यांच्या ‘बादशाहो’ चित्रपटासाठी विचारण्यात आले होते. अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. त्यांनी मला विषय सांगितला आहे. मी सध्या काही गोष्टींवर विचार करत आहे. मी जर काही निश्चित केले तर नक्कीच त्याची घोषणा लवकरच करीन.’ऐश्वर्या सध्या तिचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’ कडून खुप अपेक्षा ठेवून आहे. प्रेक्षकांचा त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे.