Join us

आर्यनही पप्पांचा ‘फॅन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 18:53 IST

किंगखान शाहरूख खानच्या चाहत्यांना कमी नाही. आत्ता तर केवळ सिनेप्रेमीच नाहीत तर त्याचे कुटुंब सुद्धा त्याच्या कामावर जाम खूश ...

किंगखान शाहरूख खानच्या चाहत्यांना कमी नाही. आत्ता तर केवळ सिनेप्रेमीच नाहीत तर त्याचे कुटुंब सुद्धा त्याच्या कामावर जाम खूश आहे, हेही स्पष्ट झालेय. आमच्याकडे याचा भक्कम पुरावाही आहे. काही मिनिटांपूर्वी शाहरूखने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ आहे, शाहरूखचा मोठा मुलगा आर्यन याचा. या व्हिडिओत आर्यन आपल्या गिटारवर शाहरूखचा आगामी चित्रपट अर्थात ‘फॅन’चे अ‍ॅन्थम साँग वाजवतांना दिसतो आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याखाली शाहरूखने गोड कॅप्शनही लिहिले आहे.  My son did this for me...reluctantly. Wish I could play the guitar....तेव्हा बघूयात आर्यनचा हा व्हिडिओ..}}}}