Join us

Aryan Khan Drugs Case:आर्यन खानने घरी येताच २४ तासांत उचललं मोठं पाऊल, पाहून तुम्हीही व्हाल चकीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 15:46 IST

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान घरी पोहोचला तेव्हा किंग खानच्या फॅन्सनी त्याचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, घरी पोहोचल्यानंतर आर्यन खानने एक मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई - आलिशान क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीप्रकरणी एनसीबीने अटक केलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची २७ दिवसांनंतर तुरुंगातून मुक्तता झाली होती. काल आर्थर रोड तुरुंगातून सुटून आर्यन खान मन्नतवर पोहोचला होता. आर्यन खान घरी पोहोचला तेव्हा किंग खानच्या फॅन्सनी त्याचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, घरी पोहोचल्यानंतर आर्यन खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने उचललेलं हे पाऊल पाहून त्याच्या फॅन्सना धक्का बसला आहे.

आर्यन खानने घरी आल्यानंतर हे मोठे पाऊल उचलले आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटचा डीपी चेंज केला आहे. त्याने स्वत:चा फोटो आपल्या प्रोफाईलवरून हटवला आहे. डीपीमध्ये आता फोटोऐवजी व्हाईट बॅकग्राऊंड दिसत आहे. त्याबरोबरच त्याच्या काही जुन्या पोस्टही दिसत आहेत. दरम्यान, आर्यन खानने असे का केले हे कळू शकलेले नाही. 

शाहरूख खान आणि गौरी खान त्यांचा मुलगा आर्यन खानसाठी गेल्या काही दिवसांपासून खूप त्रस्त झाले होते. शक्यते सर्व प्रयत्न केल्यानंतरही आर्यन खानच्या अडचणी कमी करणे शाहरूख आणि गौरी खानसाठी कठीण जात होते. खूप प्रयत्न करूनही आर्यनला जामीन मिळत नव्हता. दोन वेळा जामीन नाकारला गेल्यानंतर तिसऱ्यांदा आर्यन खानला जामीन मिळवण्यात यश मिळालं होतं.  

टॅग्स :आर्यन खानबॉलिवूडशाहरुख खान