आर्यन खानच्या बहुचर्चित 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' (Bads of Bollywood) सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. काल झालेल्या भव्य इव्हेंटमध्ये हा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. शाहरुख खानसारखाच आर्यनचाही चार्म पाहायला मिळाला. किंग खानने लेकाचं भरभरुन कौतुक केलं. सीरिजच्या प्रीव्ह्यू सध्या सगळीकडे चर्चा आहे. आर्यन खानने या सीरिजमधून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. ट्रेलर पाहून असं वाटतच नाही की आर्यनचा हा डेब्यू आहे. ट्रेलरच्या शेवटी आर्यनने स्वत:च्या जेलमध्ये तुरुंगवासावरुनही जोक केला आहे.
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये लक्ष्य लालवानी, राघव जुयाल आणि सेहर बम्बा यांची मुख्य भूमिका आहे. ट्रेलरची सुरुवात शाहरुख खानच्या व्हॉइस ओव्हरने होते. बॉलिवूड एक सपनो का शहर, पर ये शहर सबका नही होता. ये पनो की दुनिया मे कुछ लोग हिरो के घर पैदा होते है और कुछ लोग हिरो पैदा होते है! या व्हॉइस ओव्हरनंतर लक्ष्य लालवानीची दमदार एन्ट्री दिसते. नंतर राघव जुयाल, मोना सिंह, सेहर बम्बा, बॉबी देओल यांची झलक दिसते. करण जोहर, सलमान खान, रणवीर सिंहनेही कॅमिओ केलेला पाहायला मिळतो. प्रीव्ह्यूच्या शेवटी डायलॉग आहे, 'टेन्शन नही लेने का, अंदर जाके लोग और भी फेमस होते है'. हा डायलॉग लक्ष्य जेलच्या बाहेर येताना दिसतो तेव्हा पोलिस बोलतो. हा डायलॉग आर्यन खानने स्वत:वरच केलेला एक जोक असल्याचं दिसून येतं.
आर्यन खानच्या पहिल्याच सीरिजच्या प्रीव्ह्यूने चाहत्यांना प्रभावित केलं आहे. डायलॉग्स, अॅक्शन, एकापेक्षा एक स्टार्सची झलक यामुळे सीरिज खतरनाक आहे अशीच प्रतिक्रिया येत आहे. तसंच 'किल'नंतर लक्ष्य आणि राघव जुयाल एकत्र दिसत आहेत. आता सीरिजच्या रिलीजची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर सीरिज प्रदर्शित होणार आहे.