Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्शद वारसीने २५ वर्ष 'असाच' केला संसार; म्हणून घेतला कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 10:03 IST

अर्शद वारसीने केलं कोर्ट मॅरेज! पहिल्या लग्नाच्या २५ वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अर्शदने नुकतंच कोर्ट मॅरेज केलं आहे. अर्शदने त्याची पत्नी मारिया गोरेटीशी पुन्हा विवाह केला आहे. स्पेशल मॅरेज कायद्यानुसार त्याने पुन्हा एकदा पत्नीबरोबर लग्नगाठ बांधली आहे. पण, अर्शदने पुन्हा विवाह का केला? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

अर्शद आणि मारियाच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. पण, लग्न केल्यानंतर त्यांनी त्यांचं लग्न रजिस्टर केलं नव्हतं. त्यामुळे आता लग्नाच्या २५ वर्षांनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. २३ जानेवारीला त्यांनी लग्न रजिस्टर केलं आहे. जवळच्या व्यक्तींच्या निधनानंतर आणि संपत्तीच्या प्रकरणांसाठी हा निर्णय घेतल्याचं अर्शदने सांगितलं. ईटाइम्सशी साधलेल्या संवादात अर्शद म्हणाला, "लग्न रजिस्टर करण्याचा विचार कधी माझ्या डोक्यातच आला नाही. हे करणं महत्त्वाचं असेल, असंही मला कधी वाटलं नाही. आम्ही कायद्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पार्टनर म्हणून तुम्ही एकमेकांशी वचनबद्ध असाल तर तेदेखील पुरेसं आहे, असं मला वाटतं."

अर्शद आणि मारियाने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी लग्नगाठ बांधली होती. त्यांनी १४ फेब्रुवारी १९९९ रोजी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. येत्या १४ फेब्रुवारीला त्यांच्या लग्नाचा २५वा वाढदिवस आहे. लग्नाच्या २५व्या वाढदविसानिमित्त अर्शदने हा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :अर्शद वारसीसेलिब्रिटी