Join us

अर्शद वारसीच्या लेकीला पाहिलंत का? दिसायला सुंदर अन् नावही आहे खूपच युनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:41 IST

अर्शद वारसी लेकीला घेऊन 'जॉली एलएलबी ३' च्या प्रीमियरला आला होता.

अर्शद वारसी (Arshad Warsi) आणि अक्षय कुमार (AkshayKumar) यांचा 'जॉली एलएलबी ३' सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. जॉली १ आणि जॉली २ असे दोघंही या सिनेमात आमने सामने येत आहेत. अर्शद वारसी सिनेमाच्या पहिल्या भागात दिसला होता. तर अक्षय कुमार दुसऱ्या भागात होता. अभिनेते सौरभ शुक्ला याही सिनेमात जजच्या भूमिकेत आहेत. सिनेमाच्या रिलीजआधी याचा प्रीमियर झाला. प्रीमियरला अर्शद वारसीसोबत त्याची लेकही आली होती. लेकीच्या सौंदर्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या.

अर्शद वारसीच्या लेकीचं नाव जेन जोए वारसी असं आहे.'जॉली एलएलबी ३'च्या प्रीमियरला जेन वडिलांसोबत आली होत. तिने ब्लॅक रंगाचा सिंगल स्ट्रिप स्टायलिश वनपीस घातला आहे ज्यात ती सुंदर दिसत आहे. वडिलांसोबत तिने पापाराझींसमोर पोजही दिली. तिच्यात वडिलांसारखाच आत्मविश्वास दिसत होता. कॅमेऱ्यासमोर छान हसत तिने फोटोंसाठी पोज दिली. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडिओवर अनेक कमेंट्स आले आहेत. 'ही तर अगदी आईवर गेली आहे','हे दोघं बाप लेक नाही तर बहीण भाऊच वाटत आहेत','कोणाची नजर लागू नये', 'किती सुंदर दिसते' अशा कमेट्स दिसत आहेत. सिनेमात हुमा कुरेशी, अमृता राव, गजराज राव यांचीही भूमिका आहे. 

टॅग्स :अर्शद वारसीबॉलिवूड