ब्रेट लीचे ‘रुपेरी पिच’वर आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 10:57 IST
आपल्या वेगवान गोलंदाजीने सगळ्या फलंदाजांना धडकी भरवणारा आणि क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन करणारा आॅस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेट ली आता मोठ्या पडद्यावर आगमन ...
ब्रेट लीचे ‘रुपेरी पिच’वर आगमन
आपल्या वेगवान गोलंदाजीने सगळ्या फलंदाजांना धडकी भरवणारा आणि क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन करणारा आॅस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेट ली आता मोठ्या पडद्यावर आगमन करून प्रेक्षकांना घायाळ करण्यास सज्ज झाला आहे.‘अनइंडियन’ नावाच्या एका रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटातून तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. अनुपम शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात तनिष्ठा चॅटर्जी त्याची हीरोईन असणार.भारतीय सिंगली मदर आणि आॅस्ट्रेलियन शिक्षक यांची आगळीवेगळी प्रेम कहाणी यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.चित्रपटात गुलशन ग्रोव्हर आणि सुप्रिया पाठक हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्याबरोबरच अनेक भारतीय व आॅस्ट्रेलियन कलकार पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत.चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटवर लाँच करण्यात आला असून आॅगस्ट महिन्यात सिनेमा रिलीज होणार आहे. यापूर्वी ब्रेट लीने आशा भोसलेंसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले होते. तेव्हापासूनच त्याच्या फिल्म करिअरलविषयी चर्चा सुरू झाली होती.