Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्पिता भडकली; म्हणाली, कुत्तो की तरह भौंकना छोडो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 18:01 IST

सलमान खानची लहान बहीण अर्पिता खान शर्मा सध्या जाम भडकलीयं. कदाचित तिचे हे रूप तुम्ही कदाचितच पाहिले असेल. तिला ...

सलमान खानची लहान बहीण अर्पिता खान शर्मा सध्या जाम भडकलीयं. कदाचित तिचे हे रूप तुम्ही कदाचितच पाहिले असेल. तिला बरे-वाईट म्हणणाºया सोशल मीडिया युजर्सवर ती इतकी भडकली की, या युजर्सची तिने थेट भूंकणाºया कुत्र्यांशीच तुलना करून टाकली. लोकांना माझ्या खासगी आयुष्यात इतकी दखल देण्याचे कारण काय, या प्रश्नाने अर्पिता वैतागली आहे. अर्पिता सध्या पती आयुष शर्मा व मुलगा अहिलसोबत लंडनमध्ये सुट्टी घालवत आहे. यादरम्यान कुटुंबाची अनेक छायाचित्रे तिने सोशल मीडियावर पोस्ट केलीत. काही फोटोंवर अर्पिलाला चांगले कमेंट्स मिळालेत. पण काही फोटोंवरून अर्पिताला बरे-वाईट ऐकावे लागले.   वाईट प्रतिक्रिया देणाºया युजर्सवर अर्पिताने चांगलीच भडास काढली. ज्या लोकांना माझे दिसणे, माझा रंग, माझे वजन, माझे फोटो याबद्दल प्रॉब्लेम आहे. त्या लोकांची मला दया येते. हे लोक खरचं बेरोजगार व बेकार आहेत. स्वत:च्या आयुष्यात तुम्हाला करण्यासारखे काहीही नाही का? तुम्ही तुमचा वेळ चांगल्या कामांसाठी का वापरत नाही? भुंकणाºया कुत्र्यांसारखे वागून स्वत:ची पत का गमावता? अशा शब्दांत अर्पिताने आपला संताप व्यक्त केला आहे.