लाईव्ह शो आणि कॉन्सर्टदरम्यान गायक, कलाकारांसोबत उत्साही फॅन्सकडून गैरप्रकार होणं आपल्यासाठी नवं नाही. अशा घटना घडल्यानंतर त्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रसिद्ध गायक अर्पित बालासोबत हल्लीच अशी घटना घडली आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अर्पित हा चाहत्यांच्या दिशेने थुंकताना दिसकक आहे. तसेच या कृतीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
अर्पित बाला याला २०२५ मध्ये आलेल्या बरगद गाण्यामुळे खूप प्रसिद्धी मिळाली होती. दरम्यान, शनिवारी हैदराबादमधील एका कार्यक्रमात तो कला सादर करत असताना अचानक एक धक्कादायक प्रकार घडला. एका फॅनने अर्पितच्या दिशेने बाटली फेटली. त्यामुळे अर्पित संतापला आणि संतापाच्या भरात प्रतिक्रिया देताना तो चाहत्यांच्या दिशेने थुंकला.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अर्पित बाला हा संतप्त होऊन बाटली कुणी फेकली असं विचारताना दिसत आहे. त्यावेळी त्या एका चाहत्याने बटली फेकल्याचा संशय येतो. त्यानंतर तो त्याच्या दिशेने थुंकताना आणि त्याच्यावर रागावताना दिसत आहे. यादरम्यान अर्पित हा चाहत्यांना प्रत्युत्तर देत म्हणतो की, इकडे पाहा, काय झालं? त्यानंतर शिवी देत तो विचारतो की, ‘भीती वाटली? ही बाटली नेऊन बहिणीच्या लग्नात अहेर म्हणून दे’, असं सांगत तो ती बाटली प्रेक्षकांच्या दिशेने फेकताना दिसत आहे. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रेक्षकही मोठमोठ्याने ओरडताना दिसत आहेत.
Web Summary : Singer Arpit Bala, known for 'Bargad,' reacted angrily after a fan threw a bottle at him during a Hyderabad concert. He spat towards the fan, verbally abused him, and threw the bottle back into the crowd, causing uproar.
Web Summary : 'बरगद' के लिए जाने जाने वाले गायक अर्पित बाला, हैदराबाद में एक कंसर्ट के दौरान एक प्रशंसक द्वारा बोतल फेंके जाने के बाद गुस्से में प्रतिक्रिया व्यक्त की। उन्होंने प्रशंसक की ओर थूका, उसे मौखिक रूप से गाली दी और बोतल को वापस भीड़ में फेंक दिया, जिससे हंगामा हो गया।