Join us
Daily Top 2Weekly Top 5

​शेकडोंच्या गर्दीतून रस्ता काढत ‘जलसा’त शिरली चिमुकली चाहती! बिग बींनी शेअर केलेत फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 14:20 IST

अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून शेकडो चाहते दर रविवारी ‘जलसा’बाहेर ठाण मांडून बसतात.अमिताभ याला ‘संडे दर्शन’ ...

अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून शेकडो चाहते दर रविवारी ‘जलसा’बाहेर ठाण मांडून बसतात.अमिताभ याला ‘संडे दर्शन’ म्हणतात. मुंबईत असले की, दर रविवारी चाहत्यांना अभिवादन करायला बिग बी बाहेर येतात. हात हलवून चाहत्यांना अभिवादन करतात, त्यांचे आभार मानतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हा ‘सिलसिला’ सुरू आहे. या रविवारीही ‘जलसा’ बाहेर हेच चित्र दिसले. पण हा रविवार अमिताभ यांना एक गोड स्मृती देऊन गेला. या दिवसाने अमिताभ यांची  एका चिमुकल्या चाहतीशी भेट घालून दिली. अमिताभ यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर या चिमुकल्या चाहतीचे फोटो शेअर केले आहेत. ‘जलसा’बाहेर जमलेल्या शेकडोंच्या गर्दीतून ही चाहती आत आली. केवळ अमिताभ यांच्याशी हस्तांदोलन करावे, अशी तिची छोटीशी इच्छा होती.  अमिताभ अभिवादन करण्यासाठी बंगल्याबाहेर आलेत आणि ‘जलसा’चे दरवाजे उघडले गेलेत. याचक्षणाला ही चिमुकली चाहती गर्दीतून आत आली आणि अमिताभ यांच्या पुढ्यात उभी झाली.  तिने अमिताभ यांना हात हलवून अभिवादन केले. मग काय, अमिताभ यांनी लगेच या चिमुकलीला  जवळ बोलवले आणि तिचे लाडकौतुक केले.ALSO READ : ऐसे भी जाता नहीं कोई...! अमिताभ बच्चन यांची श्रीदेवींना आगळी-वेगळी श्रद्धांजली!!या क्षणाचे  काही फोटो अमिताभ यांनी शेअर केले आहेत. ‘छोटीशी चिमुकली गर्दीतून अचानक गेटच्या आत आली. केवळ माझ्याशी हात मिळवण्यासाठी. अतिशय सुंदर...’ असे त्यांनी हे फोटो शेअर करताना लिहिले आहे.अमिताभ बच्चन सध्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये बिझी आहे. कालच सोमवारी या चित्रपटाच्या उर्वरित शूटींगसाठी ते जोधपूरला रवाना झालेत. या चित्रपटात आमिर खान आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय ‘102 नॉट आऊट’ या चित्रपटातही अमिताभ दिसणार आहेत. यात ते ऋषी कपूर यांच्यासोबत दिसणार आहेत.